परभणी : कालवा दुरुस्ती संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:07 AM2018-10-28T01:07:05+5:302018-10-28T01:07:37+5:30
जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़
करपरा मध्यम प्रकल्पामध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे़ धरणाच्या पाण्यावर परिसरातील शेती सिंचनाखाली येते़ मात्र प्रकल्पाचा कालवा जागोजागी खराब झाला असल्याने या कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती़ या मागणीच्या आधारे कालव्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला़
पाटबंधारे विभागाने दुरुस्तीची कामे हाती घेतली खरी़; परंतु, कामांना गती मिळत नाही़ तीन दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्याने शेतकºयांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे़
परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी परिसरातील शेतकºयांना याच प्रकल्पाच्या पाण्यावर अपेक्षा आहे़ डाव्या कालव्याची दुरुस्ती झाल्यानंतर कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळेल आणि शेतकºयांचा रबी हंगाम सुरू होईल, अशी या शेतकºयांना अपेक्षा आहे़ मात्र कालव्याचे काम संथगतीने होत असल्याने कालवा दुरुस्त झाल्यानंतर पाणी मिळणार असल्याने रबीच्या पेरण्याही रखडल्या आहेत़
परतीच्या पावसाने ताण दिल्याने परिसरात पाणी उपलब्ध नाही. परिणामी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकºयांच्या रबीच्या पेरण्या रखडल्या आहेत.
करपरा प्रकल्पामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे हे पाणी कालव्याला सोडले असते पर रबीच्या पेरण्या झाल्या असत्या. मात्र पाणी असतानाही शेतकºयांना त्याचा लाभ होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे़ तेव्हा प्रशासनाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच शाखा अभियंत्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे़
दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली
४निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्पातून बोरी आणि परिसरातील सुमारे दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते़ रबी हंगामात प्रकल्पाच्या पाण्यावरच पेरण्या होतात़
४परंतु, यावर्षी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले नाही़ किती पाणी पाळ्या देणार या विषयीही श्ेतकºयांना माहिती दिली जात नाही़ त्यातच कालव्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने होत असल्याने कालव्याला पाणी येण्यास विलंब लागणार आहे़
४करपरा मध्यम प्रकल्पात बºयापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे या पाण्यावर रबी हंगामातील पेरणी होवू शकते़ तेव्हा पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़