परभणी : कार-दुचाकी अपघात; एक जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:45 AM2019-03-17T00:45:23+5:302019-03-17T00:46:00+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील आयटीसी सागर चौपालजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील आयटीसी सागर चौपालजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास घडली़
परभणी तालुक्यातील त्रिधारा वाडी येथील लक्ष्मण सखाराम वैद्य (१९) हे आपल्या एमएच २२ एई-४७७४ क्रमांकाच्या दुचाकीवरून परभणीहून त्रिधारावाडीकडे जात होते. त्यावेळी वसमतहून परभणीकडे येणाऱ्या एमएच ०४ ईएस-५३२६ या क्रमाकांच्या कारने वसमत रस्त्यावरील आयटीसी चौपाल सागरजवळ जोराची धडक दिली़
या धडकेत दुचाकीस्वार लक्ष्मण वैद्य हा युवक गंभीर जखमी झाला आहे़ घटनेची माहिती मिळताच महामार्गाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ कातकडे, पोना रामेश्वर खेत्री, विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दुचाकी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ ताडकळस पोलीस ठाण्याचे किशोर कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ परभणी ते वसमत हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावर प्रत्येक आठवड्यात एक ते दोन अपघात होत आहेत. या रस्त्यावर अपघातप्रवण क्षेत्र निश्चित करावेत, अशी मागणी होत आहे.