परभणी : दलालांच्या घरात जात पडताळणीची कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:37 PM2018-11-14T23:37:23+5:302018-11-14T23:37:50+5:30

येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करून बनावट जात प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दलालांच्या घरी पोलिसांच्या पथकाला थेट जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील दस्ताऐवज सापडल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रमाणपत्रांना कोठून पाय फुटले याच्या मुळापर्यंत पोलीस पोहचत आहेत़

Parbhani: Caste Verification documents in the brokered house | परभणी : दलालांच्या घरात जात पडताळणीची कागदपत्रे

परभणी : दलालांच्या घरात जात पडताळणीची कागदपत्रे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करून बनावट जात प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दलालांच्या घरी पोलिसांच्या पथकाला थेट जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील दस्ताऐवज सापडल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रमाणपत्रांना कोठून पाय फुटले याच्या मुळापर्यंत पोलीस पोहचत आहेत़
परभणी येथील तहसील कार्यालयातील कर्मचाºयांना हाताशी धरून नोंदवहीत खाडाखोड करीत बनावट जात प्रमाणपत्र देणाºया टोळीचा महसूल व पोलिसांच्या पथकाने ६ नोव्हेंबर रोजी पर्दाफाश केला होता़ या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले असून, हे सर्व आरोपी फरार आहेत़ अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील यांच्याकडे दिला आहे़ गील हे या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करीत आहेत़ पोलीस तपासामध्ये या प्रकरणातील दलालांच्या घरामध्ये थेट जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातील दस्ताऐवज आढळले आहेत़ त्यामुळे साहजिकच या दस्ताऐवजांना कोठून पाय फुटले याच्या मुळापर्यंत पोलीस जात आहेत़ त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे थेट जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयापर्यंत पोहचले आहेत़ त्या दृष्टीकोणातून पोलिसांचा तपास सुरू झाला आहे़ बनावट जात प्रमाणपत्र देऊन त्याची पडताळणीही करून दिल्याचा संशय या प्रकरणात व्यक्त होवू लागल्याने पोलिसांचा त्या दृष्टीकोणातूनही तपास सुरू झाला आहे़ शासकीय कार्यालयात नियमित वावर राहणाºया या दलालांना कोणत्या शासकीय अधिकारी- कर्मचाºयांनी मदतीचा हात पुढे केला? त्या दृष्टीकोणातूनही पोलीस पडताळणी करीत आहेत़ या प्रकरणाची व्याप्ती ही फक्त परभणी जिल्ह्यापुरतीच मर्यादित नसून अनेक जिल्ह्यांपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे आहेत़ त्यामुळे संबंधितांच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांना वेळ लागत आहे़
पोलिसांचा तपास पाहता अनेक मोठे मासे या प्रकरणात पोलिसांच्या गळाला लागणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे़ त्यामुळे हे प्रकरण उत्सुकतेचा विषय बनले आहे़
दस्त पडताळणीचे पोलिसांसमोर आव्हान
४बनावट जात प्रमाणपत्र देऊन सर्वसामान्य नागरिकांना फसविणाºया रॅकेटमधील व्यक्तींनी संबंधित कागदपत्रे देत असताना जात प्रमाणपत्राबरोबरच अन्य बनावट प्रमाणपत्रेही तयार केली आहेत़ या प्रमाणपत्रासाठी लागणारे मूळ दस्ताऐवजही बनावटच असल्याने प्रत्येक दस्तापर्यंत पोहचण्याचे व पडताळणी करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे़ त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील हे अत्यंत बारकाईने करीत आहेत़
१० जणांचे जबाब नोंदविले
४या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० जणांचे जबाब नोंदविले आहेत़ त्यामध्ये खाजगी व्यक्तींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे़ जबाब नोंदविणाºयांमध्ये परभणीसह बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींचाही समावेश आहे़
४पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांना या प्रकरणी नोटिसा दिल्या आहेत़ त्यामध्ये संबंधितांना पोलिसांकडे येऊन जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ तपासासाठी आवश्यक माहिती असलेल्यांनाच पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत़
या प्रकरणात तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला़ हे पाचही आरोपी फरार आहेत़ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे़ त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपी झाले आहेत़ करण्यात येते असलेल्या पोलीस तपासात मिळणाºया कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे ज्यांनी कोणी चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र किंवा पडताळणी प्रमाणपत्र मिळविले त्यातील बहुतांश जण सध्या अटकेच्या भीतीने फरार झाले आहेत़
तहसील कार्यालय झाले ‘अलर्ट’
या प्रकरणाची सुरुवात परभणी तहसील कार्यालयापासूनच झाली आहे़ त्यामुळे आता या प्रकरणातील फिर्यादी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी तहसीलमध्ये कामानिमित्त येणाºया व्यक्तीची नोंदणी सुरू केली आहे़ येथे येणाºया नागरिकाला त्याचे नाव, गाव, कोणत्या विभागामध्ये काम आहे आणि काय काम आहे? याबाबतची नोंद घेतली जात आहे़ वारंवार येणाºया व्यक्तींची नोंद झाल्यास त्यांना तहसील कार्यालयाकडून नोटीस बजावली जाणार आहे़ दलालांना प्रतिबंध घालण्यासाठी तहसील कार्यालय अलर्ट झाले आहे़

Web Title: Parbhani: Caste Verification documents in the brokered house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.