परभणी : तीन महिन्यांपासून टेरेसवर अडकलेय मांजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:19 AM2019-05-19T00:19:41+5:302019-05-19T00:22:23+5:30

शहरातील सोनार लाईन भागातील सांगली बँकेच्या तीन मजली इमारतीच्या वर मागील तीन महिन्यांपासून शेठ नावाचा एक मांजर (बोक्या) अडकून पडलाय. या मांजराला सोडविण्यासाठी पशुप्रेमी नाव्हेकर यांची एकाकी धडपड सुरू आहे़; परंतु, प्रशासकीय टोलवा टोलवीमुळे अजूनही या मांजरापर्यंत मदत पोहचली नाही़

Parbhani: Cat stuck on the terrace for three months | परभणी : तीन महिन्यांपासून टेरेसवर अडकलेय मांजर

परभणी : तीन महिन्यांपासून टेरेसवर अडकलेय मांजर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील सोनार लाईन भागातील सांगली बँकेच्या तीन मजली इमारतीच्या वर मागील तीन महिन्यांपासून शेठ नावाचा एक मांजर (बोक्या) अडकून पडलाय. या मांजराला सोडविण्यासाठी पशुप्रेमी नाव्हेकर यांची एकाकी धडपड सुरू आहे़; परंतु, प्रशासकीय टोलवा टोलवीमुळे अजूनही या मांजरापर्यंत मदत पोहचली नाही़
येथील सोनार गल्ली भागातील उमेश रंगनाथराव नाव्हेकर यांना मागील अनेक वर्षांपासून मांजरांचा लळा लागला आहे़ त्यांच्या घरी तीन पिढ्यांपासून मांजरांचा सांभाळ केला जातो़ उमेश नाव्हेकर यांनी सांगितले, १९७५ पासून घरात मांजर पाळले आहेत़ सध्या माझ्याकडे आठ मांजरी आहेत़ त्यापैकी एक मांजर घरातून बाहेर पडले़ या मांजराचा शोध घेतला असता, सांगली बँकेच्या इमारतीवरील छताच्या सज्जावर हे मांजर जाऊन अडकले आहे़ एवढ्या उंचावर गेलेल्या या मांजरास बाहेर काढताना अडचणी निर्माण होत आहेत़ या ठिकाणाहून विजेच्या तारा गेल्या असून, उंच शिडी लावून या मांजरास खाली काढावे लागणार आहे़ तीन महिन्यांपासून अडकलेले मांजर बाहेर काढण्यासाठी नाव्हेकर यांचे एकाकी प्रयत्न सुरू आहेत; परंतु, त्यास यश मिळत नाही़
लेकरांप्रमाणे मांजराचा सांभाळ
उमेश नाव्हेकर यांच्या घरी एकूण ८ मांजरे असून, मांजरी आणि बोके सोबत राहतात, असे त्यांनी सांगितले़ प्रत्येक मांजराला मुलाप्रमाणे ते सांभाळतात़ दूध, दही, भात, साय असे खाद्यही मांजरासाठी दिले जाते़ स्वत: शाकाहारी असतानाही साडेतीनशे रुपये किलो या दराने मिळणारे कॅट फूडही नियमितपणे मांजरांसाठी देतात़ महिनाभरात ८ किलो कॅटफूड त्यांना लागते़ तसेच दररोज ३ लिटर दूध या मांजरांसाठी लागते़
सुटीमुळे प्रयत्नांना अडथळे
मनपा प्रशासनाने या मांजरासाठी शिडी उपलब्ध करून मदत देण्याचे मान्य केले असले तरी शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटी असल्याने किमान दोन दिवसापर्यंत तरी या मांजराला मदत पोहोचणार नाही़ या शिवाय बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने दोन दिवस या मांजराला अन्नपाणीही मिळाले नाही़ परिणामी हे मांजर अशक्त झाले आहे़
सध्या या मांजराला जगविण्यासाठी दररोज तिसऱ्या मजल्यावर जाऊन दोरीच्या सहाय्याने पाणी, दूध व कॅट फूड दिले जात आहे़ आता हा मांजर अत्यवस्थ झाला असून, त्याला बाहेर काढणे गरजेचे आहे़ मांजराला बाहेर काढण्यासाठी वन विभागाकडे विनंती केली; परंतु, हा प्राणी वन्य पशू नसल्याने वन विभागाने हात वर केले. महापालिकेकडे धाव घेतली असता, मनपा अधिकाऱ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला़ शिडी पुरविण्याची तयारी दर्शविली़ पशुधन अधिकाºयांनीही प्रयत्न करण्याची हमी दिली़ मात्र मदत पोहोचली नाही.

Web Title: Parbhani: Cat stuck on the terrace for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.