परभणीत २० हजारांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:33 PM2019-03-10T23:33:26+5:302019-03-10T23:34:26+5:30
शहरातील बसस्थानकासमोर पिशव्यांमध्ये वाहून नेला जात असलेला २० हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी ९ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पकडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: शहरातील बसस्थानकासमोर पिशव्यांमध्ये वाहून नेला जात असलेला २० हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी ९ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पकडला आहे.
येथील बसस्थानकासमोरुन अवैधरित्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आरोपी खाजा खान कादर खान यांच्याकडे असलेल्या दोन पिशव्यांमध्ये गुटखा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गोवा गुटख्याचे ५० पॉकेट, वजीर गुटख्याचे ३०, प्रिमियम राज निवास सुगंधित पान मसल्याचे ३० पॉकेट जप्त केले आहेत. पकडलेल्या गुटख्याची किंमत १९ हजार २०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे, पोलीस नाईक सारंग शहाणे, प्रल्हाद देशमुख यांनी केली.