परभणी: शेळगाव येथे जागतिक चिमणी दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:48 PM2019-03-25T23:48:37+5:302019-03-25T23:49:26+5:30
तालुक्यातील शेळगाव येथील कै. बाजीराव देशमुख विद्यालयात नुकताच जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : तालुक्यातील शेळगाव येथील कै. बाजीराव देशमुख विद्यालयात नुकताच जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
तालुक्यातील ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कै. बाजीराव देशमुख विद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक चिमणी दिवसानिमित्त उन्हाळ्यात पक्षांची, चिमण्यांची व भूक भागविण्याकरीता या शाळेतील विद्यार्थ्यांनी धान्य बँक तयार केली. त्यामध्ये जमा केलेले धान्य पक्षांसाठी टाकण्यात येते. त्याच बरोबर वृक्ष मित्र महेश जाधव यांनी पक्षांची तहान भागावी, यासाठी ठिकठिकाणी मातींच्या भांड्यामध्ये पाणी उपलब्ध करून दिले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रद्धा बागवाले, सोनाली डुकरे, संध्या जाधव, वैभवी काळे, अंकिता चव्हाण, विठ्ठल आरगडे, जैनुद्दीन शहा आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजकुमार धबडे होते.
श्रद्धा बागवाले हिने सूत्रसंचालन तर संध्या जाधव हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.