परभणी : ५ दिवसांत २३२ शस्त्रक्रियांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:23 PM2019-03-25T23:23:19+5:302019-03-25T23:24:36+5:30

येथील ग्रामीण रुग्णालयाला मार्च अखेरपर्यंत ४१२ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले असून आत्तापर्यंत १८० शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अजूनही २३२ शस्त्रक्रिया ५ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान ग्रामीण रुग्णालय प्रशासनासमोर आहे.

Parbhani: The challenge of 232 surgeries in 5 days | परभणी : ५ दिवसांत २३२ शस्त्रक्रियांचे आव्हान

परभणी : ५ दिवसांत २३२ शस्त्रक्रियांचे आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): येथील ग्रामीण रुग्णालयाला मार्च अखेरपर्यंत ४१२ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले असून आत्तापर्यंत १८० शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अजूनही २३२ शस्त्रक्रिया ५ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान ग्रामीण रुग्णालय प्रशासनासमोर आहे.
लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आरोग्य विभागाला ग्रामीण आणि शहरी भागात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी ठराविक उद्दिष्ट देण्यात येते. ही बाब पूर्णत: ऐच्छिक असल्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. त्याच बरोबर आर्थिक लाभ व वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. मात्र तरी सुद्धा नागरिकांचा या शस्त्रक्रिया वेळेत करण्याकडे कल कमी असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे उद्दिष्ट देण्यात आले होते. ग्रामीण भागाला आरोग्य विभागाने दिलेले ३५१ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. उलट ४२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीणमध्ये उद्दिष्टापेक्षा जास्त कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली. ग्रामीण रुग्णालयाला शहरासाठी ४१२ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा उजडला तरी ग्रामीण रुग्णालयामार्फत केवळ १८० कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्याची डेडलाईन ३१ मार्च असल्याने ५ दिवसांत उर्वरित २३२ शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय कसे पूर्ण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाची शिबीर आयोजित करुन समाधानकारक आकडा गाठता न आल्याने याला रुग्णालय प्रशासन जबाबदार आणि उदासीन असल्याचे दिसून येत आहे. अलिकडच्या काळात पाळणा लांबविण्यासाठी इंजेक्शन, कॉपर टी व इतर साधनांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असल्याने अनेकजण कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भाग आघाडीवर
४शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची कामगिरी सरस असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्राथामिक आरोग्य केंद्र कोल्हांतर्गत १८४ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते.
४या ठिकाणी उद्दिष्टापेक्षा जास्तीच्या ७४ शस्त्रक्रिया अशा एकूण २६० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील प्राथामिक आरोग्य केंद्र रामपुरींतर्गत १६७ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. याठिकाणी १५८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
४त्यामुळे ग्रामीण भागात ३५१ चे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र ४२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागच कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्याच्या बाबती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
एका ही पुरुषावर शस्त्रक्रिया नाही
अनेकदा पुरुषी मानसिकतेतून स्त्रियांना डावलण्याचा प्रयत्न होतो. मात्र कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया स्त्रियांवरच लादल्या जातात. राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रात महिलांच्या पुढे-पुढे करणारे पुरुष शस्त्रक्रियेच्या बाबतीत कारभारणीच्या मागे असल्याचे चित्र आहे. अलिकडच्या काळात तालुक्यात एकाही पुरुषावर शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Web Title: Parbhani: The challenge of 232 surgeries in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.