परभणी : नागरिकत्व दुरुस्ती कायदा; विरोधात भाकपचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:02 AM2019-12-20T01:02:34+5:302019-12-20T01:03:05+5:30

परभणी : नागरिकता सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले़

Parbhani: Citizenship Amendment Act; Hold CPI against | परभणी : नागरिकत्व दुरुस्ती कायदा; विरोधात भाकपचे धरणे

परभणी : नागरिकत्व दुरुस्ती कायदा; विरोधात भाकपचे धरणे

Next

परभणी : नागरिकता सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले़
संसदेमध्ये मंजूर करून घेतलेला नागरिकता सुधारणा कायदा भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता आणि समता या मूल्यांची विसंगत करणारा आहे़ मात्र हा कायदा जनतेवर लादण्याचे काम भाजप करीत आहे़ विविध जाती धर्माचे नागरिक या देशात राहतात; परंतु, भाजपाचे सरकार हिंदू राष्ट्र ही संकल्पना आणू पाहत आहे़, असा आरोप करीत या दोन्ही कायद्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ या आंदोलनानंतर नागरिकता सुधारणा कायदा रद्द करावा, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी रद्द करावी, जामिया मिलीया, इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हे नोंदवावेत आदी मागण्या करण्यात आल्या़ या आंदोलनात भाकपचे कॉ़ शेख अब्दुल, प्रेमकुमार धोंगडे, सय्यद अजहर, कॉ़ ओंकार पवार, प्रसाद गोरे, प्रशांत सोनटक्के, नंदकुमार टोम्पे, शेख अब्दुल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
युवक काँग्रेसची घोषणाबाजी
परभणी : सीएबी, एनआरसी कायदा रद्द करावा, दिल्लीतील विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाºया पोलीस कर्मचाºयांवर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी शहरातील महात्मा फुले चौकात युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी घोषणाबाजी करून आंदोलन केले़ सीएबी व एनआरसी कायदा संविधान विरोधी आहे़, तो रद्द करावा, लोकशाही मार्गाने दिल्ली येथे आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाºया पोलीस अधिकाºयांवर कठोर कारवाई करावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़
४यावेळी परभणी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अकबर जहागीरदार, सेवा दलाचे अध्यक्ष सुरेश देसाई, एनएसयुआयचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, सचिन जवंजाळ, श्रीराम जाधव, दिगंबर खरवडे, ज्ञानेश्वर जोगदंड, जाहेब सिद्दीकी, मो़ इलियास, मयूर मोरे, राजेश रेंगे, सिद्धार्थ लोणकर, वैजनाथ देवकते, विशाल तनपुरे आदींची उपस्थिती होती़

Web Title: Parbhani: Citizenship Amendment Act; Hold CPI against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.