परभणी: दहावीच्या परीक्षेत भरारी पथकांना सापडेनात कॉप्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:14 AM2018-03-06T00:14:27+5:302018-03-06T00:15:28+5:30

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात झाली असून, काही केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असताना शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या पथकांना मात्र कॉप्या सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़

Parbhani: In the Class X examination, | परभणी: दहावीच्या परीक्षेत भरारी पथकांना सापडेनात कॉप्या

परभणी: दहावीच्या परीक्षेत भरारी पथकांना सापडेनात कॉप्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात झाली असून, काही केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असताना शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या पथकांना मात्र कॉप्या सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १ मार्चपासून जिल्हाभरात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे़ जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर ३१ हजार ८८९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत़ सोमवारी दहावीचा द्वितीय व तृतीय भाषा हिंदीचा पेपर होता़ यामध्ये २२ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ त्यापैकी २२ हजार ११३ विद्यार्थी उपस्थित होतो़ ८३२ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले़ ९५ केंद्रांवर ९५ बैठे पथक व ५५ भरारी पथके नियुक्त करण्यात आली असली तरी या पेपरला एकही कॉपी सापडली नाही़ विशेष म्हणजे तालुक्यातील पेडगाव येथील केंद्रांवर अधिक कॉप्या होत आहेत़ याशिवाय परभणी शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील केंद्रांवरही मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असताना शिक्षण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे़ परिणामी कॉपीमुक्त परीक्षेचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे़

Web Title: Parbhani: In the Class X examination,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.