परभणी: व्हरांड्यात भरतात वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:12 AM2019-07-15T00:12:48+5:302019-07-15T00:12:57+5:30
मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात तीन वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाल्याने सध्या दोन वर्ग खोल्यातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेची ही परिस्थिती असून, शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
ताडबोरगाव (परभणी): मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात तीन वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाल्याने सध्या दोन वर्ग खोल्यातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेची ही परिस्थिती असून, शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय होत आहे़
ताडबोरगाव येथे जिल्हा परिषदेचीशाळा असून, या शाळेत मराठी व उर्दू माध्यमाचे २६० विद्यार्थी शिक्षण घेतात़ मे महिन्यात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला होता़ त्यावेळी शाळेतील तीन वर्ग खोल्यांची पत्रे वाºयाने उडून गेली़ त्यामुळे सद्यस्थितीला शाळेमध्ये केवळ ५ वर्ग खोल्या उपलब्ध आहेत़ जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर वर्ग खोल्यांची अडचण प्रशासनासमोर निर्माण झाली़ त्यामुळे पहिली आणि दुसरीचा वर्ग एकत्रित भरविला जात आहे़ तर तिसरी आणि सहावीचा वर्ग आलटून पालटून व्हरांड्यात भरविला जातो़ त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ व्हरांड्यातील अपुरी जागा, पुरेशा भौतिक साधनांचा अभाव, आजुबाजूचा गोंगाट यामुळे विद्यार्थ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे़
पत्रे व भिंती झाल्या धोकादायक
४सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शाळेच्या व्हरांड्यात छतावर टाकलेली पत्रे जागोजागी फुटलेली आहेत़
४पाऊस पडल्यानंतर हे पत्रे गळतात़ संपूर्ण व्हरांड्यात पाणी साचते़ तसेच भिंतीही खिळखिळ्या झाल्या आहेत़
४भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून, पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे़
४शाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला तरीही दुरुस्ती संदर्भात शिक्षण विभाग लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे़
जिल्हा परिषदेने सहा नवीन वर्ग खोल्या मंजूर केल्या असून, लवकरच बांधकाम सुरू केले जाणार आहे़ हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत दोन सत्रांत शाळा भरविली जाईल़
-विठ्ठल गुंगाने, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती