परभणी : हमीभाव खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:11 AM2018-04-21T00:11:19+5:302018-04-21T00:11:19+5:30
जिल्ह्यातील नाफेडच्या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १८ हजार १७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३ हजार ३२१ शेतकºयांचीच ५५ हजार ४०१ क्विंटल तुर १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली आहे़ त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदीअभावी पडून आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील नाफेडच्या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १८ हजार १७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३ हजार ३२१ शेतकºयांचीच ५५ हजार ४०१ क्विंटल तुर १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली आहे़ त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदीअभावी पडून आहे़
जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे़ मात्र सुरुवातीच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत तूर विक्री करावी लागली; परंतु, व्यापाºयांनी शेतकºयांच्या तुरीची कवडीमोल दराने खरेदी सुरू केली़ त्यामुळे तूर उत्पादक अडचणीत आला़ त्यानंतर शेतकरी व काही संघटनांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर शासनाने फेब्रुवारी महिन्यात नाफेडचे सहा हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले़ तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाथरी येथे सातवे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी व पाथरीचा समावेश आहे़ या केंद्रांवर तुरीची खरेदी करण्याची गती कमी होती़ १८ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले होते़ त्यानुसार जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे १८ हजार १७३ शेतकºयांनी तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली होती़ त्यापैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे़ त्यातच राज्य शासनाने तूर खरेदीसाठी दिलेली मुदत १८ एप्रिल रोजी संपली आहे़ त्यामुळे उर्वरित तूर उत्पादकांची तूर खेरदी करण्यासाठी मुदत वाढून द्यावी, अशी मागणी होत आहे़
अशी झाली नोंदणी
तूर हमीभाव खरेदी केंद्रावर तूर उत्पादकांनी केलेली केंद्रनिहाय नोंदणी परभणी- ४०८९, जिंतूर- २९१७, गंगाखेड-३५१७, सेलू- ३०१८, पूर्णा- ८४९, बोरी-२७३२ तर नव्याने सुरू झालेल्या पाथरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर १८४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ त्यापैकी केवळ १० शेतकºयांची तूर खरेदी झाली आहे़ उर्वरित १७४ शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़
हरभºयाला दोन केंद्रावर मुहूर्त मिळेना
राज्य शासनाने नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील सात हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीबरोबरच हरभºयाची खरेदी करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार परभणी येथील केंद्रावर १८ शेतकºयांचा ३२६ क्विंटल, जिंतूर येथील १७ शेतकºयांचा २२७ क्विंटल, सेलू येथील २९ शेतकºयांचा ३७७ क्विंटल, पूर्णा येथील १६ शेतकºयांचा २०६ क्विंटल तर पाथरी येथील १० शेतकºयांचा १२० क्विंटल ५० किलो हरभºयाची खरेदी करण्यात आली आहे़ यासाठी राज्य शासनाने मे महिन्यापर्यंत मुदवाढ दिली आहे़
जिल्ह्यातील गंगाखेड व बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर अद्यापपर्यंत हरभºयाची खरेदी सुरू झालेली नाही़ त्यामुळे नोंदणी केलेले हरभरा उत्पादक मुदतीअभावी अडचणीत येण्याची शक्यता आहे़ त्यामुळे हरभरा खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे़
५५ हजार क्विंटल तुरीची खरेदी
नाफेडकडून जिल्ह्यातील सात हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले होते़ या हमीभाव खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील १८ हजार १७३ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ राज्य शासनाने दिलेल्या १८ एप्रिलपर्यंतच्या मुदतीत केवळ ३ हजार ३२१ शेतकºयांची ५५ हजार ४०१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली़
यामध्ये परभणी केंद्रावर ३२० शेतकºयांची ५ हजार ९९१ क्विंटल, जिंतूर ७०३ शेतकºयांची १२ हजार ९, गंगाखेड ५७३ शेतकºयांची ८ हजार ७९७ क्विंटल ५० किलो, सेलू ७८१ शेतकºयांची ११ हजार ८५४ क्विंटल ५० किलो, पूर्णा ४८० शेतकºयांची ८ हजार १२५ क्विंटल, बोरी येथे ४३२ शेतकºयांची ८३२० क्विंटल तर पाथरी येथील १७ शेतकºयांची ३२३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे़
उर्वरित १४ हजार ८५२ शेतकºयांनी नोंदणी करूनही हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून तुरीची खरेदी करण्यात आलेली नाही़ त्यामुळे या शेतकºयांमध्ये राज्य शासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे़ त्यामुळे १५ दिवसांत या शेतकºयांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे़
शेतकरी अडचणीत
हमीभाव खरेदी केंद्रावर वेळेत तुरीची खरेदी होईल अशी अपेक्षा तूर उत्पादकांना होती़ मात्र पेरणीपूर्व मशागत तोंडावर आली असताना शेतकºयांच्या घरात साठवण केलेली तूर तशीच पडून आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़