परभणी जिल्हाधिकाºयांनी घेतली कडक भूमिका : पालम, गंगाखेडचे तहसीलदार सक्तीच्या रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:12 AM2017-12-31T00:12:21+5:302017-12-31T00:12:26+5:30
गोदावरी नदीच्या अवैध वाळू उपस्यावरून झालेल्या कारवाईवरून पालमचे तहसीलदार रंगनाथ मेंडके यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, गंगाखेडचे तहसीलदार छडीदार हे स्वत:च रजेवर गेले असले तरी त्यांनाही रजेवर जाण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे समजते़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गोदावरी नदीच्या अवैध वाळू उपस्यावरून झालेल्या कारवाईवरून पालमचे तहसीलदार रंगनाथ मेंडके यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, गंगाखेडचे तहसीलदार छडीदार हे स्वत:च रजेवर गेले असले तरी त्यांनाही रजेवर जाण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे समजते़
जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाईचा धडाका सुरू केला आहे़ या संदर्भात कामचुकारपणा करणाºया अधिकाºयांना त्यांनी चांगलेच धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे़ या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालम तालुक्यात दुटका गुंज येथे जवळपास ५ हजार ब्रॉस अवैध रेतीसाठा जप्त केला होता़ या संदर्भातील लिलाव करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदार रंगनाथ मेंडके यांना दिले होते़ मेंडके यांनी प्रत्यक्षात ८०० ब्रॉसचाच लिलाव करून संबंधितांना पावती दिली़
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी पाहणी केली असता, प्रत्यक्ष अधिक वाळू साठा असल्याचे लक्षात आले़ या ठिकाणाहून अधिक वाळू नेली जात असताना काही वाहने पकडण्यात आली़ पंचनाम्यात जवळपास ५ हजार २०० ब्रॉस वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले़ या पार्श्वभूृमीवर दंडापोटी १ कोटी रुपये वसूल करण्यात आले़ पिंपळगाव मुरूड येथेही ४ हजार ब्रास वाळू असताना मेंडके यांनी ९०० ब्रॉस वाळू दाखवून लिलाव केला़ त्यानंतर केलेल्या पाहणीत जवळपास अडीच हजार ब्रास वाळू पकडली गेली़ शिवाय अवैध वाळू उपसा करणाºया एका जेसीबी चालकालाही मेंडके यांनी दंड ठोठावला नाही़
या कारणांमुळे कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी तहसीलदार रंगनाथ मेंडके यांना सक्तीच्या रजेवर पाठविले असून, त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सांगितले़ त्यामुळे मेंडके यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे़
दरम्यान, गंगाखेडचे तहसीलदार आसाराम छडीदार हेही रजेवर गेले आहेत़ रजेचे कारण त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले असले तरी अवैध वाळू उपसा व अवैध वाळूसाठ्यावरूनच त्यांना रजेवर जाण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते़
या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तहसीलदार छडीदार हे वैद्यकीय रजेवर गेले असल्याचे सांगितले.
डापकर यांच्यावरच पदभाराची मेहरबाणी
सोनपेठचे तहसीलदार जीवराज डापकर यांच्यावर महसूल प्रशासन चांगलेच मेहरबाण झाल्याचे दिसून येत आहे़ काही महिन्यांपूर्वी डापकर यांना पालमच्या तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला होता़ आता पालमचा पदभार जीवराज डापकर यांच्याकडून काढून तो नायब तहसीलदार कदम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ गंगाखेडचे तहसीलदार आसाराम छडीदार रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार डापकर यांनाच देण्यात आला आहे़ विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सखाराम मांडवगडे, महसूल सहाय्यक तथा तहसीलदार विद्या शिंदे हे दोन तहसीलदार उपलब्ध असतानाही डापकर यांच्यावरच का मेहरबाणी दाखविली जात आहे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़
महसूल विभाग करणार ड्रोन कॅमेºयांची खरेदी
अवैध वाळू उपस्याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने लवकरच ड्रोन कॅमेºयाची खरेदी करण्यात येणार आहे़ तशी माहिती जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिली़ खरेदी करण्यात येणाºया ड्रोनच्या माध्यमातून ५ ते १० किमीपर्यंत लक्ष ठेवण्यात येणार आहे़ शिवाय किती वाळू उपस्यास परवानगी देण्यात आली आहे व प्रत्यक्षात संबंधित ठेकेदारांकडून किती वाळू उपसा केला जात आहे, याकडेही या माध्यमातून लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़