परभणी : रंगीत खडूंनी रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:08 AM2019-02-20T00:08:03+5:302019-02-20T00:08:45+5:30

शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र पाथरी तालुक्यातील माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने लक्षवेधक चित्र रेखाटतात. पंकज बिरादार असे या शिक्षकाचे नाव आहे.

Parbhani: A colorful chalk drawn by Shiva | परभणी : रंगीत खडूंनी रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र

परभणी : रंगीत खडूंनी रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र

Next

सुमेध उघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र पाथरी तालुक्यातील माळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने लक्षवेधक चित्र रेखाटतात. पंकज बिरादार असे या शिक्षकाचे नाव आहे. मेहनत आणि कल्पकतेच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी त्यांनी रेखाटलेले चित्र दिवसभर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय बनले होते़
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात माळीवाडा येथे जि़प़ची भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. या शाळेत पंकज बिरादार मागील वर्षभरापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुळचे उदगीर तालुक्यातील बिरादार यांना चित्रकलेची आवड आहे. मात्र त्यांनी याचे कुठेही शिक्षण घेतले नाही. शाळेत 'फलक लेखन' असा शिक्षकांच्या कायार्चा एक भाग असतो. यातूनच त्यांनी बोर्डवर रंगीत खडूंच्या सहाय्याने चित्र रेखाटन सुरु केले. विद्यार्थ्यांना दिनविशेष समजावून सांगण्यात त्यांच्या या चित्रांची मोठी मदत होत आहे. आकर्षक रंगसंगतीत रेखाटलेली ही चित्रे शिक्षकांच्या वतुर्ळात चर्चेची ठरली आहेत़
यातूनच त्यांची रेखाटने सोशल मीडियातून व्हायरल झाली. अंक आणि अक्षरांशिवाय काळ्या फळ्यावरची ही आकर्षक रेखाटने सध्या चर्चेची ठरत आहेत.
पुण्यावरून मागविला जातो विशेष खडू
४रेखाटन करण्यासाठी लागणारे रंगीत खडू परभणी जिल्ह्यात उपलब्ध होत नाहीत. यामुळे बिरादार हे खडू पुण्यातून मागवतात. मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी याच खडूंच्या सहाय्याने शुभेच्छा चित्र रेखाटले आहे. हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांना अडीच तासांचा अवधी लागला. शिवजयंती दिनीच उत्कृष्ट छायाचित्र त्यांनी रेखाटल्याने त्यांचे हे चित्र लागलीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यासोबतच त्यांनी नुकताच झालेला पुलवामा येथील दहशवादी हल्ला, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, म़ गांधी, लालबहादूर शास्त्री, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला आदींसदर्भात सुरेख चित्रे रेखाटली आहेत.
छंद म्हणून जोपसना
शाळेत 'फलक लेखन' या प्रकारातून मला रेखाटन करण्याचा छंद जडला. यातूनच रंगीत खडूंच्या सहाय्याने मी दिनविशेष वेगळ्या पध्दतीने रेखाटने सुरु केले. येथे येताच शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी शिक्षकांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले. यामुळे माझ्या छंदाची जोपासना होतेच, शिवाय विद्यार्थ्यांना एका वेगळ्या कलेची ओळखही होते.
-पंकज बिरादार, प्राथमिक शिक्षक, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा

राज्यमंत्री सदाभाऊ खोत झाले प्रभावित
काही दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शाळेस भेट दिली. यावेळी बिरादार यांनी त्यांच्या समक्षच केवळ १० मिनिटात खडूंच्या सहाय्याने त्यांचे चित्र रेखाटले. यामुळे प्रभावित झालेल्या खोत यांनी त्यांचे कौतुक केले होते.

Web Title: Parbhani: A colorful chalk drawn by Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.