परभणी : एकाच दिवशी तीन ठिकाणी आगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:09 AM2019-05-15T00:09:17+5:302019-05-15T00:09:50+5:30
तालुक्यातील आलापूर पांढरीसह सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी आणि पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी आगीच्या घटना घडल्या असून कडबा, ऊस आणि शेती औजारे जळून खाक झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील आलापूर पांढरीसह सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी आणि पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी आगीच्या घटना घडल्या असून कडबा, ऊस आणि शेती औजारे जळून खाक झाली आहेत.
परभणी तालुक्यातील आलापूर पांढरी येथे १४ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतातील कडब्याला आग लागली. पांढरी येथील शेषराव आबासाहेब धस यांनी शेतामध्ये कडब्याची गंजी करून ठेवली होती. दुपारच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाला. त्यामध्ये १ हजार कडबा, सोयाबीन भुश्याच्या पाच ते सात बॅग, स्प्रिंकलर सेट, नांगर, वखर आदी शेतीची औजारे जळून खाक झाली. सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दरम्यान, आग लागल्याची माहिती समजताच गावातून टंँकर बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ही आग इतर ठिकाणी पसरली नाही; परंतु, आगीत कडबा आणि इतर साहित्याचे नुकसान टळू शकले नाही.
मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. तापमान वाढल्याने कडबा तसेच वाळलेल्या गवताला आग लागून शेती साहित्याचे नुकसान होत आहे. यापूर्वी पाथरी, सेलू, गंगाखेड, जिंतूर तालुक्यात आगीच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
वाघाळ्यात १० एकर ऊस जळून खाक
च्पाथरी- तालुक्यातील वाघाळा येथील सदाशिव मुळे यांच्या शेतात आग लागून १० एकरवरील ऊस जळून खाक झाला. १३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
च्वाघाळा परिसरात कालव्याच्या बाजूने सदाशिव मुळे यांचे कुटुंबिय शेतात घर करून राहतात. त्यांनी १० एकरमध्ये उसाची लागवड केली आहे. १३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आग लागून ऊस जळून खाक झाला.
च्गावातील टँकरच्या सहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यामुळे ही आग घरापर्यंत पोहचली नाही. कोणी तरी आग लावली असावी, असा संशय मुळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी व्यक्त केला आहे. तसेच या आगीत ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
डिग्रसवाडीत कडबा जळाला
च्सेलू- तालुक्यातील डिग्रसवाडी येथे लोंबकळलेल्या वीज तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत कडबा जळाल्याची घटना १४ मे रोजी घडली. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वीज तारांच्या घर्षणाने बांधावरील गवताने पेट घेतला. पाहता पाहता ही आग वाढत गेली. या परिसरातील पाशू खॉ मन्नान खान पठाण यांच्या शेतात ठेवलेल्या कडब्याने पेट घेतला.
च्त्या शेजारील ठेवलेले सरपणही जळून खाक झाले. काही वेळातच सेलू नगरपालिकेची अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत साधारणत: दोन ते अडीच हजार कडबा जळाल्याने शेतकºयासमोर चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.