परभणी : सीईटी परीक्षेत चुकीचा प्रश्न विचारल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:26 AM2018-05-12T00:26:43+5:302018-05-12T00:26:43+5:30
गुरुवारी पार पडलेल्या एमएचसीईटी परीक्षेत गणित विषयाचा एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. १० मे रोजी परभणी जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत गणित विषयासाठी चुकीच्या पद्धतीने एक प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गुरुवारी पार पडलेल्या एमएचसीईटी परीक्षेत गणित विषयाचा एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
१० मे रोजी परभणी जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत गणित विषयासाठी चुकीच्या पद्धतीने एक प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
बुकलेट क्रमांक ११ मध्ये ४९ क्रमाकांचा प्रश्न, बुकलेट २२ मध्ये २४ क्रमांकावर, बुकलेट ३३ मध्ये चौथ्या क्रमांकावर तर बुकलेट ४४ मध्ये ३९ व्या क्रमांकावर हा प्रश्न विचार करण्यात आला. ‘द इक्वेशन आॅफ दी लाईन पासिंग थ्रु द पॉर्इंट (-३, १) अॅन्ड बायसायटींग द अँगल बिटवीन कोआॅर्डीनेट अॅक्सीस इज’ असा प्रश्न विचारला.
प्रत्यक्षात हा प्रश्न चुकीचा असल्याने त्याचे पर्यायही चुकीचे आहेत. त्यामुळे या प्रश्नासाठी दिलेला एकही पर्याय योग्य ठरत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, असे प्रा.जितेंद्र देशमुख व प्रा.संतोष पोपडे यांनी सांगितले. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सीईटी परीक्षेत विचारलेल्या या चुकीच्या प्रश्नांचे २ गुण विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.