परभणी : नुकसानीच्या पंचनाम्यात दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:13 AM2018-02-20T00:13:11+5:302018-02-20T00:13:25+5:30
आठ दिवसांंपूर्वी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिके आडवी झाली. प्रशासनाने या पिकांचे पंचनामे सुरू केले खरे. मात्र केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आठ दिवसांंपूर्वी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिके आडवी झाली. प्रशासनाने या पिकांचे पंचनामे सुरू केले खरे. मात्र केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे.
मागील आठवड्यात ११, १२ व १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यात जिंतूर, सेलू, पूर्णा, पालम आणि गंगाखेड तालुक्यामध्ये गारपीट झाली. तर परभणी तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नोंद महसूलच्या अधिकाºयांनी घेतली आहे. दुसरीकडे अवकाळी पाऊस व वादळी वाºयामुळे झालेल्या नुकसानीकडे चक्क कानाडोळा करण्यात आला आहे. परभणी तालुक्यात गारपीट व वादळी वाºयाने रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, महसूल प्रशासनाने ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे त्या ठिकाणचेच पंचनामे केले आहेत.
मात्र वादळी वाºयाने तालुक्यातील आर्वी, टाकळी कुंभकर्ण, शहापूर, तुळजापूर, कुंभारी बाजार, डिग्रस, मांडवा, कारला, काष्टगाव आदी गावातील गहू, ज्वारी ही पिके भूईसपाट झाली आहे. मात्र महसूल प्रशासनाने या पिकांचे अद्याप पंचनामे केले नाहीत. मोठा खर्च करून रबी हंगामात पेरणी केलेल्या शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळी वाºयाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने वाºयाने भूईसपाट झालेल्या पिकांचेही पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.