परभणी : ७८ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:12 AM2019-05-01T00:12:10+5:302019-05-01T00:15:45+5:30

सौर ऊर्जाद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांपैकी ७८ शेतकºयांना वीज जोडणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

Parbhani: Connecting Solar Agricultural Pipes to 78 Farmers | परभणी : ७८ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी

परभणी : ७८ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाची जोडणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सौर ऊर्जाद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांपैकी ७८ शेतकºयांना वीज जोडणीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत. त्या शेतकºयांनी यापूर्वी कृषपंपासाठी वीज जोडणी घेतलेली नाही किंवा वीज जोडणीचे पैसे भरुनही त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका बसणार नाही. जेणेकरुन रात्री- अपरात्री सिंचनासाठी शेतकºयांना जावे लागत होते. यापासून दिलासा मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील ५ हजार ९६८ शेतकºयांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २ हजार ६०४ शेतकºयांचे अर्ज विविध कारणाअभावी अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे ३ हजार ३६५ अर्ज हे मंजूर झाले. त्यापैकी ८८६ शेतकºयांना सौर कृषीपंपासाठी महावितरण कंपनीने कोटेशन दिले आहे. विशेष म्हणजे कोटेशन देण्यात आलेल्या ४०६ शेतकºयांनी आपल्या हिस्स्याची रक्कमही वीज वितरण कंपनीकडे भरली आहे. कोटेशन भरलेल्या ३५९ शेतकºयांनी एजन्सीची निवड केली असून सीआरआय पंपस्, टाटा पॉवर सोलार सिस्टीम, मुद्रा सोलार, रवींद्र एनर्जी व जैन इरिगेशन सिस्टीम या एजन्सीच्या माध्यमातून ७८ शेतकºयांच्या वीज जोडणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश महावितरणने दिले असून एजन्सीनेही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पात्र ठरलेल्या ४५ शेतकºयांनी अद्यापही काम करणाºया एजन्सीची निवड केली नाही. त्यामुळे या शेतकºयांची कामे प्रलंबित आहेत. एजन्सीची निवड केल्यास लवकर कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती महावितरणने दिली.
१४४ शेतकºयांना एचव्हीडीएस योजनेतून दिली जोडणी
शेतकºयांना उच्चदाब प्रणालीच्या माध्यमातून सुरळीत वीज पुरवठा व्हावा, या उद्देशाने जवळपास ६ महिन्यांपूर्वी ऊर्जा विभागाने जिल्ह्यातील कृषीपंपधारकांसाठी ८६ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला स्वतंत्र विद्युत रोहित्र देण्यात येत आहे. उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या माध्यमातून ८१४ विद्युत रोहित्र अद्यापपर्यंत उभे करण्यात आले आहेत.
१४४ शेतकºयांना वीज जोडणीचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी दिली.
अशी करावी लागते नोंदणी
४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ही आॅनलाईन असून शेतकºयांना स्वत: महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन अर्ज करावा लागत आहे. विशेष म्हणजे कोणतेही कागदपत्र आॅफलाईन स्वीकारण्यात येत नाहीत. अर्जदारांनी अर्ज करीत असताना सातबारा,पाण्याचे स्त्रोत, जमिनीचे क्षेत्रफळ, आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक आदींची माहिती त्या अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ५ एकरपर्यंत ३ एचपी व ५ एकरवरील क्षेत्रफळास ५ एचपीचा सौरपंप मंजूर केला जात आहे. त्यामुळे महावितरणच्या या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Parbhani: Connecting Solar Agricultural Pipes to 78 Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.