परभणी : पाथरीत बांधकाम मजुरांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:45 AM2018-12-08T00:45:05+5:302018-12-08T00:45:23+5:30
मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यात यावे, या मागणीसाठी पाथरी शहर आणि ग्रामीण भागातील बांधकाम मजुरांनी ७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यात यावे, या मागणीसाठी पाथरी शहर आणि ग्रामीण भागातील बांधकाम मजुरांनी ७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
वाळू अभावी शहरातील तसेच ग्रामीण भागातील बहुतांश बांधकामे बंद आहेत. त्यामुळे मजुरांना काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मजुरांनी ३ डिसेंबर रोजी पाथरी तहसीलदारांना निवेदन देऊन कामे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती; परंतु, प्रशासनाकडून कोणतीही पाऊले उचलण्यात आली नसल्याने ७ डिसेंबर रोजी शहरातील बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी हातामध्ये मागण्यांचे फलक घेतले होते. या मोर्चामध्ये नगरसेवक अलोक चौधरी, जावेद राज यांच्यासह गवंडी, मिस्त्री आदी मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले.