परभणी : मांसाहारी खाद्यपदार्थाने तलावातील पाणी दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:29 AM2019-07-23T00:29:57+5:302019-07-23T00:30:36+5:30
तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत.
जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा, भूसकवाडी या भागामध्ये छोटे-मोठे २५ तलाव आहेत. या तलावांमध्ये मागील काही दिवसांपासून मांगूर या जातीच्या माशाचे बीज टाकले जाते. या माशांची वाढ लवकर व्हावी, म्हणूून यासाठी या माशांना खाद्य म्हणून कुजलेले सडलेले मास व अन्न टाकले जात आहे. आंध्र प्रदेशातील काही व्यक्ती वाहनाद्वारे हे मांस या भागात आणत असून हे तळ्यामध्ये टाकण्यात येत आहे. मांस टाकल्यामुळे तळ्यातील पाणी दुषित झाले आहे. या भागातील अनेक जनावरे हे दूषित पाणी पीत असल्याने त्यांना आजारांची लागण होत आहे. विशेष म्हणजे हे पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त व घाणेरडे बनले आहे. त्यामुळे या भागामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्र्माण झाली आहे. या माशांच्या जातीवर शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही आंध्र प्रदेशातील कंत्राटदाराने गाव पातळीवरील पुुढाऱ्याला हाताशी धरून हा खेळ सुरू केला आहे. या सर्व प्रकाराला टाकळखोपा व भुसकवाडी येथील काही व्यक्ती जबाबदार आहेत.
पाणीपुरवठा योजना आली धोक्यात
४मांगूर मासे पालन होणाºया तळ्यामध्ये दर आठवड्याला पाण्याची बदली करण्यात येते. विशेष म्हणजे हे पाणी सिद्धेश्वर जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये सोडले जाते. यामुळे पाणी दूषित होत आहे.
४मांगूरच्या प्रादुर्भावामुळे होणारे दूषित पाणी दर आठवड्याला सिद्धेश्वर जलाशयात सोडण्यात येते. या जलाशयातून १६ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. परिणामी दुर्गंधीयुक्त पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
तात्काळ कावाई करा
४टाकळ खोपा, भुसकवाडी या भागांमधील तलावांमध्ये विविध प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्या अरूणा काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.