परभणी : कामगार मतदारांसाठी नियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:31 PM2019-04-16T23:31:37+5:302019-04-16T23:32:42+5:30

कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी कामगारांना पगारी सुटी देण्याचे अथवा अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश आहेत. त्याच प्रमाणे या कामगारांच्या मदतीसाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

Parbhani: Control room for labor voters | परभणी : कामगार मतदारांसाठी नियंत्रण कक्ष

परभणी : कामगार मतदारांसाठी नियंत्रण कक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी कामगारांना पगारी सुटी देण्याचे अथवा अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश आहेत. त्याच प्रमाणे या कामगारांच्या मदतीसाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील दुकाने, निवासी हॉटेल, अन्नगृहे, नाट्यगृहे, तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर इ. आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदानाच्या दिवशी सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेडच्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने परभणी येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात बी.आर. वाघाळकर यांची नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
तसेच शेरखॉ पठाण, विवेक निटुरे यांची सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या कक्षामध्ये कामगार मतदारांना योग्य ते मार्गदर्शन, सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Parbhani: Control room for labor voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.