परभणी:कापूस जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:11 AM2019-03-23T00:11:18+5:302019-03-23T00:11:32+5:30

रळीरोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

Parbhani: Cotton Jining fire | परभणी:कापूस जिनिंगला आग

परभणी:कापूस जिनिंगला आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : परळीरोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
शहरापासून जवळच परळी रोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये कापसाची गंजी लावण्याचे काम सुरू असताना २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कापसाने अचानक पेट घेतला. यावेळी जिनिंगमध्ये असलेल्या कामगारांनी अग्नीरोधक यंत्राच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने गंगाखेड नगरपालिका, परभणी महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या वाहनांसह शहरातील खाजगी पाण्याच्या टँकरने जळालेल्या कापसाच्या गंजीवर पाणी मारून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तपत्या उन्हात असलेल्या कापसाने अधिकच पेट घेतला. या घटनेत जिनिंगमध्ये असलेल्या २ हजार क्विंटल कापसाला आगीच्या झळा पोहचल्याने यात अंदाजे ७० ते ७२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार जिनिंग मालक हरिप्रसाद भिक्कूलाल सोनी (रा. शिक्षक कॉलनी, गेवराई जि. बीड) यांनी पोलीस ठाण्यात दिल्याने आकस्मीत जळीताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पो.ना. प्रल्हाद मुंडे करीत आहेत.

Web Title: Parbhani: Cotton Jining fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.