परभणी: सेलू बाजार समितीत कापसाचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:43 PM2019-04-02T23:43:47+5:302019-04-02T23:44:05+5:30
मागील दोन दिवसांपासून सेलूच्या बाजारात कापसाच्या भावात वाढ होत आहे. सोमवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल भाव शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): मागील दोन दिवसांपासून सेलूच्या बाजारात कापसाच्या भावात वाढ होत आहे. सोमवारी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल भाव शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
सोमवारी बाजार समितीच्या कापूस यार्डात शहरातील खाजगी व्यापारी रामेश्वर राठी, गोपाळ काबरा, आशिष बिनायके, निर्मल आदी व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला ६ हजार १५० रुपये प्रति क्विंटल कमाल भाव मिळाला. ५ हजार ९४० किमान भाव आणि ६ हजार ३० रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव होता. मंगळवारी कमाल दरात थोड्या प्रमाणात घसरण झाली. कापसाचे कमाल भाव ६ हजार १२५ तसेच किमान भाव ५ हजार ९५० तर सरासरी भाव ६ हजार ६० रुपये प्रति क्विंटल मिळाला असल्याचे बाजार समितीकडून माहिती देण्यात आली. कापसाची आवक चांगली होत असून शेतकऱ्यांनी आपल्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकºयांनी आपला कापूस बाजार समितीच्या कापूस यार्डात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती रविंद्र डासाळकर यांनी केले आहे.