परभणी : बनावट दस्तऐवज प्रकरणी तीन लाभार्थ्यांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:19 AM2019-03-03T00:19:49+5:302019-03-03T00:20:22+5:30
बनावट कागदपत्र दाखल करुन प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी ३ लाभार्थ्यांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : बनावट कागदपत्र दाखल करुन प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी ३ लाभार्थ्यांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नायब तहसीलदार परमानंद गावंडे यांनी या प्रकरणी १ मार्च रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार उज्ज्वला गंगाधर पंडित (रा. जिंतूर), आश्रोबा खंडूजी पारधे (रा.नांगणगाव) आणि राहुल सोपान खिल्लारे (रा.मोहखेडा) यांनी १९ मे रोजी तहसील कार्यालयात उत्पन्न प्रमाणपत्र काढले होते. या प्रमाणपत्राविषयी २८ फेब्रुवारी रोजी शंका आल्याने उपविभागीय अधिकारी पारधी यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यावर उज्ज्वला पंडित यांनी शैक्षणिक कामासाठी, अश्रोबा पारधे यांनी शासकीय योजनेसाठी या प्रमाणपत्राचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन जिंतूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी बोगस सातबारा वापरुन महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील दोन आरोपींचा अद्यापही शोध लागला नाही.