परभणी : शासकीय गोदामात वाद घालणाऱ्या दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:42 AM2019-01-26T00:42:10+5:302019-01-26T00:42:29+5:30
तालुक्यातील पेठशिवणी येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामामध्ये गोदामपाला सोबत वाद घालून गोंधळ घालणाºया दोघांविरोधात पालम पोलिसांत २४ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यातील पेठशिवणी येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामामध्ये गोदामपाला सोबत वाद घालून गोंधळ घालणाºया दोघांविरोधात पालम पोलिसांत २४ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठशिवणी येथे तहसील कार्यालयामार्फत स्वस्तधान्य दुकानदारांना धान्य वाटप करण्यासाठी गोदाम आहे. या गोदामातून तालुक्यात शासनाच्या स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येते. मागील पंधरा दिवसांपासून या गोदामात धान्य घोटाळा झाल्याने राज्यभर याची चर्चा सुरू आहे. येथील गोदामपालचा पदभार न घेतल्याने जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सुमेध वाघमारे या कर्मचाººयाला निलंबित केले आहे. कामाचा पदभार तहसील कार्यालयातील कारकून प्रल्हाद वाकोडे यांना देण्यात आला आहे. २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ते गोदामात गेले होते. याचदरम्यान वाहतूक ठेकेदार प्रतिनिधी अरुण पवार यांचा ट्रक शासकीय धान्य घेऊन गोदामात आला होता. या ट्रकमधून माल उतरणे चालू होते. हमाल हा माल उतरत असताना पोते फोडून माल काढला जात असल्याचा प्रकार सुरू होता.
याच दरम्यान रुपेश सोनटक्के यांनी हा काय प्रकार चालू आहे? माल का काढून घेतला जात आहे, अशी विचारणा करीत गोदामाची व माल काढून घेतानाची शुटींग करणे चालू केले. यावेळी गोदामपाल वाकोडे व देशमुख यांच्यात वाद झाला त्यानंतर बारा वाजण्याच्या दरम्यान स्वस्त धान्याचे वाटप करण्यासाठी ट्रक तांदूळवाडी व वरखेड येथे जात असताना रुपेश देशमुख व सचिन पाटील या दोघांनी वाहन अडविले तसेच गोदामातील रजिस्टर व परमिटचे मोबाईल मध्ये फोटो काढून घेतले.
गोदामपाल वाकोडे हे नवीन असल्याने त्यांना गोदामातील प्रकार लक्षात आला नाही. त्यांनी तहसीलदार कदम यांच्याशी चर्चा करून माहिती देतो, असे देशमुख यांना सांगितले; परंतु, त्यांनी वाकोडे यांचे न ऐकता वाद घालून शासकीय कामात अडथळा आणीत धमकी दिल्याची फिर्याद प्रल्हाद बाबूसा वाकोडे यांनी पालम पोलिसांमध्ये दिली. त्यानंतर २४ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता याप्रकरणी रुपेश सोनटक्के व सचिन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार नामदेव राठोड हे करीत आहेत.