परभणी : एड्स जनजागृतीसाठी काढली सायकलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:30 AM2019-07-02T00:30:40+5:302019-07-02T00:31:15+5:30
येथील होमिओपॅथिक रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे डॉ़ पवन चांडक व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी २९ व ३० जून या दोन दिवसांत आळंदी ते पंढरपूर हा ३०० किमीचा सायकल प्रवास करून या भागात एचआयव्ही आणि पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील होमिओपॅथिक रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे डॉ़ पवन चांडक व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी २९ व ३० जून या दोन दिवसांत आळंदी ते पंढरपूर हा ३०० किमीचा सायकल प्रवास करून या भागात एचआयव्ही आणि पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली़
डॉ़ पवन चांडक, आकाश गिते आणि प्रा़ शरद लोहट या तिघांनी २९ जून रोजी पुणे स्टेशन येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली़ लोणीकंद, थेवूळ, उरली कांचनमार्गे यवत जवळ जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन पालखीतील वारकऱ्यांशी संवाद साधला़ त्यानंतर चौफुलामार्गे पाटस येथील जगताप, नवनाथ शिथोळे व ग्रामस्थांनी या सायकलस्वारांचे स्वागत केले़
भिगवण येथे रोटरी क्लबच्या सदस्यांशी संवाद साधत या ठिकाणी मुक्काम करण्यात आला़
३० जून रोजी इंदापूर येथील सायकलिंग क्लब, सामाजिक कार्यकर्ते, इंदापूर काँग्रेसभवन आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली़ अकलूज, वेळापूरमार्गे पंढरपूर येथे पोहचल्यानंतर पालवी प्रकल्पातील ८५ एड्सग्रस्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत या प्रकल्पातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडची मदत करण्यात आली़
या सायकलवारीसाठी निसर्ग सायकल मित्र पुणे येथील सदस्य, नवनाथ शिथोळे, विशाल मुंदडा, वेळापूर येथील औदंूंबर भिसे, भिगवण येथील संजय चौधरी, डॉ़ जयप्रकाश खरड, इंदापूर येथील कैलास कदम, पालवी येथील डिम्पल घाडगे, मंगलाताई शहा यांचे सहकार्य लाभल्याचे डॉ़ चांडक यांनी सांगितले़
५० हजार किमीचा टप्पा पूर्ण
४डॉ़ पवन चांडक यांनी सहावी पंढरपूर सायकलवारी पूर्ण केली आहे़ या वारीसोबतच मागील साडेपाच वर्षांत विविध भागात त्यांनी सायकलिंग करीत जनजागृती केली़ आतापर्यंत त्यांनी ५० हजार किमी सायकलिंग प्रवास केला असून, त्याद्वारे जनजागृती केली आहे़