परभणी : जुन्या पेन्शनसाठी धडकला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:06 AM2019-01-28T01:06:41+5:302019-01-28T01:06:53+5:30
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ पूर्ववत लागू करुन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने २७ जानेवारी रोजी जिंतूर रोडवरील जि.प. परिसरातून कर्मचाºयांचा मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ पूर्ववत लागू करुन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने २७ जानेवारी रोजी जिंतूर रोडवरील जि.प. परिसरातून कर्मचाºयांचा मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा परिषद कार्यालयासमोरुन या मोर्चाला प्रारंभ झाला. शासकीय सेवेतील विविध संवर्गातील कर्मचारी हातात फलक घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. उड्डाणपूल, बसस्थानक, रेल्वेस्थानकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाºयांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाºया कर्मचाºयांना १९८२ व १९८४ अंतर्गत निवृत्ती वेतन योजना बंद करुन परिभाषित शदायी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे स्वरुप व अंमलबजावणी पाहता जुन्या पेन्शन प्रमाणे सुनिश्चित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन असुरक्षित झाले आहे. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष असून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे २३ आॅक्टोबर २०१७ चा वरिष्ठ वेतन श्रेणीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षेतून वगळण्यात यावे इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात संघटनेचे विभागीय अध्यक्ष सिकंदर पाचमासे, राज्य समन्वयक प्रद्मुम्न शिंदे, शाम गिरी, जिल्हाध्यक्ष डी.व्ही. राजे, प्रा.किरण सोनटक्के, रवि लोहट, सुशील वाघमोडे, सिद्धेश्वर मुंडे, प्रवीण सोनटक्के, हनुमान गलांडे, विश्वंभर देवडे आदींसह कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.