परभणी : जिंतुरच्या शासकीय गोदामात सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:48 AM2018-10-27T00:48:14+5:302018-10-27T00:49:21+5:30

येथील शासकीय धान्य गोदामात प्रत्येक पोत्यामागे दोन किलोचे धान्य कमी भरत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गोदामपालाची बदली होऊनही गोदामातील सावळा गोंधळ बाहेर येऊ नये म्हणून गोदामपाल पदभार सोडण्यास तयार नाही.

Parbhani: A dark muddle in the government godown of Zimba | परभणी : जिंतुरच्या शासकीय गोदामात सावळा गोंधळ

परभणी : जिंतुरच्या शासकीय गोदामात सावळा गोंधळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): येथील शासकीय धान्य गोदामात प्रत्येक पोत्यामागे दोन किलोचे धान्य कमी भरत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गोदामपालाची बदली होऊनही गोदामातील सावळा गोंधळ बाहेर येऊ नये म्हणून गोदामपाल पदभार सोडण्यास तयार नाही.
जिंतूर येथील शासकीय गोदाम नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. अंत्योदय योजनेपासून सर्व योजनांचे गहू, तांदूळ, साखर हे धान्य या गोदामात असते. गोदामातून धान्य द्वार पोहोच असतानाही अनेक दुकानदार, धान्य विकत घेणारे एजंट या ठिकाणी ठाम मांडून असतात.
विशेष म्हणजे गोदामातून धान्य वाटप करताना नेमके धान्य द्वार पोहोचने टेम्पो भरला जातो की, टेम्पो इतरत्र जातो? याकरीता टेम्पोवर कुठलेच चिन्हाकीत बॅनर, सेन्सॉर सिस्टीम लावलेली नाही. अनेक टेम्पो परस्पर काळ्या बाजारात जातात. गोदामात ५०-५० किलोचे गहू व तांदळाचे कट्टे आहेत. पण वास्तविकत: ते ४८ ते ४९ किलोच भरतात. धान्य दुकानदारही काळा बाजार करीत असल्याने कोणी जाब विचारत नाहीत. विचारला तर त्यांच्या दुकानाची तपासणी निघते. एकंदरीत सध्या ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ ही गत शासकीय दुकानदार व गोदामपालाची झाली आहे.
द्वार पोहोच योजनेंतर्गत धान्य पोहोचविण्यासाठी लावण्यात आलेल्या अनेक वाहनांमध्ये सेन्सॉर सिस्टीम नाही. तसेच खाजगी वाहनातूनही धान्याची वाहतूक होते. गोदामात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे नावालाच आहेत. काम करणारे कामगार यांनाही मलिदा मिळत असल्याने ते यामध्ये सहभागी आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने संबधितांचे चांगलेच फावत आहे.
गोदाम तपासण्या उरल्या नावालाच

४गोदामाची नियमित तपासणी तहसीलदार, नायब तहसीलदार व जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात येते;परंतु, तपासणी करीत असताना केवळ कागदी घोडे नाचविले जातात. नेहमीच्या तपासण्या असल्याने कोठे काय करावे लागते? हे गोदामपालाला सहज लक्षात येते.
४विशेष म्हणजे शासकीय गोदाम सायंकाळी ६ वाजता बंद होणे अपेक्षित असताना रात्री ९ ते १० पर्यंत गोदामात काम चालते. विशेष म्हणजे रात्री खाजगी लोकांचा गोदामात वावर असतो. त्याच बरोबर काही दलालही गोदामात बसून असतात. हा सर्व प्रकार प्रशासन मात्र निमूटपणे बघत आहे.
मद्य प्राशनाचे ठिकाण बनले गोदाम
४या ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन केल्या जाते. काही विशिष्ट व्यक्ती गोदाम किपरच्या कार्यालयात बसून हा प्रकार करतात.
४यामुळे प्रशासन नेमके करते तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासकीय गोदामात पोत्यातील धान्य कमी येणे, रात्रीच्या वेळी गोदाम सुरू असणे आदी प्रकाराची चौकशी करू.
-सुरेश शेजूळ,
तहसीलदार, जिंतूर

Web Title: Parbhani: A dark muddle in the government godown of Zimba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.