परभणी : १ हजार २० कोटींची होणार कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:51 PM2020-01-15T23:51:26+5:302020-01-15T23:54:17+5:30
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार २७३ शेतकऱ्यांकडील १ हजार २० कोटी ९२ लाख ९९ हजार ८७२ रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. तशी मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.
प्रसाद आर्वीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार २७३ शेतकऱ्यांकडील १ हजार २० कोटी ९२ लाख ९९ हजार ८७२ रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. तशी मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.
राज्यात सातत्याने निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत शेतकºयांकडील २ लाख रुपयापर्यंतचे अल्प मुदतीचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात खरीप आणि रबी हंगामासाठी शेतकरी विविध बँकांमधून पीक कर्ज घेतात. या कर्जावर कृषी हंगामातील कामे केली जातात. शासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर बँकांनी खातेनिहाय शेतकºयांची यादी आणि त्यांच्याकडील कर्जाची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. १० जानेवारीपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील विविध बँकांमधील १ लाख ७२ हजार २७३ खातेदार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून त्यांच्या खात्यावरील कर्जमाफ करण्यासाठी १ हजार २० कोटी ९२ लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज घेतले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या ५८ हजार ८९ शेतकºयांचे १५४ कोटी ८८ लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांमधील ४८ हजार ४७७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून या शेतकºयांकडील ३९९ कोटी ५६ लाख रुपये कर्ज माफ होणार आहे. त्याच प्रमाणे वाणिज्य बँकांमधील १ लाख २ हजार ७०० शेतकºयांकडील ८१३ कोटी रुपयांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील ३९ हजार ६०० शेतकºयांकडील २६२ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे उपलब्ध झालेल्या या माहितीनुसार कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी आणि त्यांची रक्कम याची माहिती शासनाला कळविली जाणार असून अजूनही बँकांकडून ही माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे पात्र शेतकºयांची संख्या आणि कर्जमाफीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
योजनेत आणली सुसूत्रता : शेतकºयांच्या याद्या होणार प्रसिद्ध
४महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योेजनेंतर्गत सुसूत्रता आणली आहे. तीन टप्प्यामध्ये ही योजना राबविली जाणार असून त्यात बँकांना १ ते २८ रकान्यात माहिती भरावयाची आहे. १ ते २० फेब्रुवारी या काळात पहिला टप्पा सुरु होणार असून २१ ते २७ फेब्रुवारीत पहिली यादी जाहीर होईल. तर २० फेब्रुवारी ते ५ मार्च या काळात दुसºया टप्प्याला प्रारंभ होणार आहे.
४कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची यादी बँक, खाते क्रमांक आणि कर्जमुक्तीच्या रकमेसह प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकºयांनी जवळच्या आपले सेवा केंद्रावर जावून अपलोड झालेल्या यादीवर स्वत:चा खातेक्रमांक, आधारक्रमांक आणि कर्जमाफीची रक्कम तपासायची आहे.
४ही रक्कम तपासल्यानंतर आॅनलाईन अॅग्री आणि डिसअॅग्री असे दोन पर्याय शेतकºयांना दिले असून अॅग्री हा पर्याय निवडल्यानंतर प्रत्यक्ष शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच काही चूक आढळल्यास डिसअॅग्री पर्याय निवडून शेतकरी स्वत:ची कर्जाची रक्कम, आधारक्रमांकातील दुरुस्ती करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
७० कोटींचे पुनर्गठित कर्ज होणार माफ
४ज्या शेतकºयांनी त्यांच्या कर्जाचे पूनर्गठण केले आहे, अशा शेतकºयांचे २ लाख रुपयापर्यंतचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकलेले हप्ते माफ केले जाणार आहेत. यासाठी विविध बँकांमधील ३४ हजार शेतकरी पात्र ठरले असून या शेतकºयांकडे २४६ कोटी रुपयांचे पुनर्गठित कर्ज आहे. या कर्जाचे थकलेले हाप्ते माफ केले जाणार असून त्यासाठी साधारणत: ७० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
४ राष्ट्रीयकृत बँकेमधून बहुतांश शेतकºयांनी कर्जाचे पुनर्गठण केले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियामधील २० हजार ७७६ शेतकºयांच्या पुनर्गठित कर्जमाफीसाठी ५४ कोटी रुपये तर मराठवाडा ग्रामीण बँकेतील ३ हजार ७५५ शेतकºयांच्या पुनर्गठित कर्जासाठी ६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
१९ हजार खाती आधारविना
४महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांचे खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील १९ हजार ३९२ शेतकºयांची खाती आधार लिंक नसल्याची माहिती मिळाली आहे.
४या शेतकºयांचे आधारक्रमांक संकलित करण्याचे काम बँकांकडून केले जात आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४ हजार ७२६ खातेदारांचे क्रमांक लिंक नाहीत.
४तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ३२९, वाणिज्य बँकांमधील १३ हजार ७३७ खातेदारांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या शेतकºयांचे आधार क्रमांक मिळविण्याचे काम सध्या सुरु आहे.