परभणी : सोन्याचे आमिष दाखवून केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:16 AM2019-09-19T00:16:59+5:302019-09-19T00:17:42+5:30

कमी पैशांत सोने देतो म्हणून कर्नाटक राज्यातील विजापूर येथील एका कुटूंबास लुटल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील रामनगर येथे घडली असून, बुधवारी सोनपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़

Parbhani: Deception committed by gold bait | परभणी : सोन्याचे आमिष दाखवून केली फसवणूक

परभणी : सोन्याचे आमिष दाखवून केली फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): कमी पैशांत सोने देतो म्हणून कर्नाटक राज्यातील विजापूर येथील एका कुटूंबास लुटल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील रामनगर येथे घडली असून, बुधवारी सोनपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़
कर्नाटक राज्यातील विजापूर येथील नागअप्पा सोमअप्पा यंटमन हे कुटुंब महिनाभरापूर्वी तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते़ त्यावेळी नागाअप्पा यंटमन यांच्या पत्नीची एका महिलेसोबत ओळख झाली़ या दोन्ही महिलांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही दिले़ पंधरा दिवसांनी नागाआप्पा यांच्या पत्नीला फोन आला व शेतामध्ये सोने सापडले आहे, तुम्हाला कमी पैशांत सोने देऊ, असे सांगितले़ त्यामुळे नागाआप्पा हे गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा येथे आले़
या ठिकाणी आरोपींनी नागाअप्पा यांना एक सोन्याची चीप दिली़ नागाअप्पा यांनी सोनाराकडे त्याची खात्री केली असता, ती खरी असल्याचे सांगण्यात आल़़े़ त्यामुळे नागाअप्पा त्यांची पत्नी व मुलगा हे तिघेही गंगाखेड येथे आले़ आरोपींनी तिघांनाही रामनगर येथे नेले़ याच वेळी आरोपींनी नागाअप्पा व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली व त्यांच्या खिशातील १ लाख ३० हजार रुपये जबरीने काढून घेतले़ तसेच १६ हजार रुपये किंमतीची सोन्याची फुलेही काढून घेतली़ या प्रकारानंतर हे कुटुंबिय कर्नाटकात आपल्या गावाकडे निघून गेले़ विजापूर पोलिसांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला़ १८ सप्टेंंबर रोजी विजापूर पोलिसांसोबत नागाआप्पा यंटमन सोनपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले़ त्यांच्या फिर्यादीवरून गिरमिल्या भोसले व इतर दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सहायक पोलीस उपनिरीक्षक बळीराम जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत़

Web Title: Parbhani: Deception committed by gold bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.