परभणी : प्राप्त याद्यांवर समिती घेणार निर्णय; आठ दिवसांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:01 AM2017-12-24T00:01:46+5:302017-12-24T00:01:52+5:30

दिवाळीचा मुहूर्त साधत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पात्र शेतकºयांना कर्जमाफी झाल्याची घोषणा केली असली तरी कोणत्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला याची अजूनही खात्री झाली नसून जिल्हास्तरावर कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या करण्याचे काम सुरूच आहे़ पात्र शेतकºयांची अंतीम यादी घोषित करण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे़

Parbhani: Decision to be taken by committee; Wait eight days | परभणी : प्राप्त याद्यांवर समिती घेणार निर्णय; आठ दिवसांची प्रतीक्षा

परभणी : प्राप्त याद्यांवर समिती घेणार निर्णय; आठ दिवसांची प्रतीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दिवाळीचा मुहूर्त साधत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पात्र शेतकºयांना कर्जमाफी झाल्याची घोषणा केली असली तरी कोणत्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला याची अजूनही खात्री झाली नसून जिल्हास्तरावर कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या करण्याचे काम सुरूच आहे़ पात्र शेतकºयांची अंतीम यादी घोषित करण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे़
परभणी जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ३२७ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरले आहेत़ या अर्जांची यादी शासनाकडे गेली असून, त्यातून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांना माफीचा लाभ दिला जाणार आहे़ दिवाळीपूर्वी कर्जमाफीची घोषणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरुपात शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप केले़ जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्ह्यातील २० शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप झाले़ असे असले तरी जिल्ह्यातील इतर शेतकºयांना मात्र माफीचा लाभ मिळाला की नाही? या विषयी संभ्रम आहे़ प्रत्यक्षात कर्जमाफीचे कामकाज अद्याप पूर्ण झाले नाही़ उपलब्ध माहितीनुसार शेतकºयांनी अपलोड केलेल्या अर्जांमधून ग्रीन, येलो आणि रेड अशा तीन भागांत यादी तयार करण्यात आली आहे़ ही यादी तालुकास्तरीय समितीपर्यंत पोहचली आहे़ तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष असून, सहाय्यक निबंधक हे सहसचिव आहेत़
तालुकास्तरीय समिती या संपूर्ण यादीची तपासणी करणार आहे़ प्रत्येक यादीतील शेतकºयांच्या नावासमोर या समितीला अ‍ॅप्रूव्ह किंवा डिसअ‍ॅपव्हू असे दोन पर्याय दिले असून, पात्र शेतकºयांना अ‍ॅप्रूव्हू केल्यानंतर कर्जमाफी झाल्याचा मॅसेज थेट शेतकºयांच्या मोबाईलवर जाणार आहे. तालुकास्तरीय समितीने कर्जमाफीच्या लाभातून अपात्र ठरविलेल्या शेतकºयांना त्यांचे आक्षेप उपविभागीय समितीकडे दाखल करता येतील़
या समितीनंतर जिल्हास्तरीय समितीकडेही आक्षेप नोंदविता येतील. आयकर विभाग, शासकीय कार्यालय, सहकार निबंधक कार्यालय यांच्याकडून कर्मचारी, अधिकारी तसेच ५० हजरांपेक्षा अधिक कर भरणाºयांची यादी शासनाकडे उपलब्ध करण्यात आली असून, या यादीनुसार ग्रीन, येलो आणि रेड या गटांत शेतकºयांच्या अर्जांचे विभाजन करण्यात आले आहे़ त्यामुळे या तीनही गटांतून कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची यादी तयार होणार असून, त्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे़
संकेतस्थळावर : मिळेना माहिती
राज्यस्तरावरून शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकºयांनी आपले सरकार या संकेतस्थळावर कर्जमाफीच्या यादीत आपले नाव आहे का? याचा शोध सुरू केला़ विशेष म्हणजे सोशल मीडियातूनही कर्जमाफी झाल्याची माहिती कशी मिळवायची याविषयीच्या पोस्ट फिरत असल्याने अनेक शेतकºयांनी संकेतस्थळावर जावून नावाचा शोध घेतला़ परंतु, नाव नसलेल्या शेतकºयांची संख्याच अधिक असल्याचे दिसून आले़ त्यामुळे आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला की नाही? या विषयी शेतकºयांमध्ये संभ्रम आहे़ या सर्व पार्श्वभूमीवर परभणी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क केला असता कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्याच अजून तयार नसल्याची माहिती समोर आली आहे़
बँकाही तयार करणार याद्या
तालुकास्तरीय समितीला शेतकºयांच्या याद्या तीन गटांत प्राप्त झाल्या आहेत़ या याद्यांमधून कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची यादी तयार होईल़ दुसºया बाजुला बँका देखील ज्या शेतकºयांना कर्जमाफी द्यावयाची आहे, अशा शेतकºयांची खातेनिहाय याद्या तयार करणार असून, एकूण शेतकरी, एकूण खाते क्रमांक आणि त्यावर कर्जमाफीसाठी लागणारी रक्कम अशी एकत्रित माहिती शासनाला कळविली जाणार आहे व कर्जमाफीसाठी लागणाºया रकमेची मागणी केली जाईल, ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाल्यानंतरच तो शेतकरी नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र ठरेल़

Web Title: Parbhani: Decision to be taken by committee; Wait eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.