परभणी : हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:08 AM2019-07-06T00:08:47+5:302019-07-06T00:09:41+5:30
तालुक्यातील ब्राह्मणगाव, सोन्ना शिवारात हरणांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन विभागाने या हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील ब्राह्मणगाव, सोन्ना शिवारात हरणांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन विभागाने या हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली आहे.
ब्राह्मणगाव, सोन्ना शिवारात २०० ते ३०० हरणांचा कळप फिरत आहे. या भागातील शेतकºयांनी पहिल्याच पावसात कापसाची लागवड केली आहे. कापसाचे पीक आता अंकुरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र हरणांचे कळप या पिकाचे नुकसान करीत आहेत. अधिच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदील झाले असताना त्यात या नुकसानीला सामोेरे जावे लागत आहे. तेव्हा हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुरेशराव बेंडे, बालकिशन काळदाते, विठ्ठल गाडगे, पुरुषोत्तम काळदाते, अंबादास काळदाते, वामन काळदाते, सुरेश गाडगे, विकास काळदाते आदींनी केली आहे.
रस्ता उखडला
परभणी : शहरातील गोरक्षण ते नवा मोंढा या दरम्यानच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत.
यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.