परभणी : मानवत तहसीलसमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:45 PM2019-06-11T23:45:39+5:302019-06-11T23:46:16+5:30
तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
मागील चार महिन्यांपासून हमदापूर गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनंत अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.
ग्रामसेविकेने पाणीटंचाई निवारणा संदर्भात पंचायत समितीकडे पाठपुरावा करणे अपेक्षित असताना ग्रामसेविका तीन महिन्यांपासून गावात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊन केला आहे. वांरवार मागणी करुनही उन्हाळाभर ग्रामस्थांना पाणी उपलब्ध झाले नाही. त्यातच ग्रामसेविका गैरहजर राहत असल्याने कारवाई करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सरपंच सीमा ज्ञानोबा निळे, भागवत गायकवाड, किरण शिंदे, उत्तम शिंदे, हनुमान शिंदे, मधुकर उफाडे, नामदेव उफाडे, विद्याधर गायकवाड, भागुबाई निळे, सचिन हरबडे, माऊली शिंदे, परमेश्वर टिपरे, सिद्धार्थ गायकवाड, गौतम सहजराव, हरिभाउ उफाडे, भगवान निळे, निवाजी उफाडे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनानंतर तहसील डी.डी. फुफाटे यांना निवेदन देण्यात आले. गटविकास अधिकारी डी.बी. घुगे यांनी कारवाई संदर्भात आश्वासन दिले.