परभणी : खराब बस लाईनवर पाठविल्याने आगारप्रमुखाचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:51 PM2019-09-14T23:51:41+5:302019-09-14T23:52:23+5:30
खराब एसटी बस लाईनवर पाठविल्याने परभणी आगाराच्या आगारप्रमुखांवर औरंगाबाद येथील उपमहाव्यवस्थापकांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: खराब एसटी बस लाईनवर पाठविल्याने परभणी आगाराच्या आगारप्रमुखांवर औरंगाबाद येथील उपमहाव्यवस्थापकांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे.
परभणी आगारातून परभणी- कुंभारी या एम.एच.०७-बीएल ७२२१ क्रमांकाच्या बसचा समोरील भाग नादुरुस्त अवस्थेत असतानाही प्रवाशांची ने-आण करण्यात आली. त्यानंतर ही बस परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार येथील बसस्थानकावर पोहचली.
या ठिकाणी बसने ये-जा करणाऱ्या काही युवकांनी ‘परभणी- कुंभारी शिवशाही’ अशी टॅग लाईन देत सोशल मीडियावर नादुरुस्त बसची छायाचित्रे पोस्ट करुन परभणी आगाराने वाभाडे काढले. ही पोस्ट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर एस.टी.महामंडळाच्या मुंबई व औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांनी या छायाचित्रांची दखल घेत याबाबत चौकशी करण्याचे आदेश परभणी विभागातील यंत्र अभियंता एम.आर. नगराळे यांना दिले. त्यांनी गाडीच्या दुरुवस्थेची पाहणी करुन आपला अहवाल मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाला सादर केला. या अहवालात आगारप्रमुख दयानंद पाटील या गाडीच्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचे समोर आले. त्यानंतर औरंगाबाद येथील एस.टी. महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक पंचभाई यांनी आगारप्रमुख दयानंद पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
याबाबत यंत्र अभियंता एम.आर.नगराळे यांना विचारणा केली असता प्रवासी सुरक्षीतता आमच्यासाठी महत्वाची आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी दिलेल्या आदेशावरुन आगारप्रमुख दयानंद पाटील यांचे निलंबन झाल्याचे ते म्हणाले.
फेसबुकवरची पोस्ट निलंबनाचे कारण
४परभणी आगारातून दरदिवशी अनेक फेºया बस दुरुस्तीअभावी रद्द करण्याच्या घटना वेळा घडल्या आहेत; परंतु, वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत कधीच पाऊले उचलली नाहीत; परंतु, परभणी- कुंभारी या बसचा शो पूर्णपणे कोलमडला असताना ती बस दुरुस्त करण्याऐवजी लाईनवर पाठविण्यात आली. त्यानंतर काही युवकांनी त्या बसचे फोटो ‘परभणी- कुंभारी शिवशाही बस’ या टॅगलाईनने पोस्ट करीत एस.टी.महामंडळाचे वाभाडे काढले. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी कार्यालयाने ही कारवाई केली आहे.