परभणी आगार: भंगार बसने प्रवाशांना करावा लागतोय प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:18 AM2019-04-20T00:18:08+5:302019-04-20T00:18:46+5:30
येथील आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बसद्वारे प्रवासी प्रवास करतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या आगारातून भंगार बसचा वापर होत असल्याने नाईलाजास्तव या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येथील आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बसद्वारे प्रवासी प्रवास करतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या आगारातून भंगार बसचा वापर होत असल्याने नाईलाजास्तव या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
परभणी आगारामधून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अकोला आदी महत्त्वांच्या शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवासी बसने प्रवास करतात. बसचा प्रवास प्रवाशांना सुरक्षित वाटत असल्याने प्रवासीही बसच्या प्रवासाला पसंती देतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून परभणी आगारातून दररोज भंगार बसचा वापर केला जात आहे. अनेक बसच्या खिडक्या तुटलेल्या असून बसमध्ये धूळही साचली आहे. अशा भंगार बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे; परंतु, याकडे आगारप्रमुखांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. याकडे विभागीय नियंत्रकांनी लक्ष देऊन प्रवाशांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.