परभणी : मानवत रोड-पाथरी रेल्वेमार्गाबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:35 AM2019-12-19T00:35:32+5:302019-12-19T00:36:33+5:30

मानवतरोड ते पाथरी हा रेल्वेमार्ग करण्याची मागणी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी अनेक दिवसांपासून लावून धरली असून या संदर्भात त्यांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी मोघम उत्तर दिल्याची बाब समोर आली आहे.

Parbhani: Depression on humanity road-stone railway line | परभणी : मानवत रोड-पाथरी रेल्वेमार्गाबाबत उदासिनता

परभणी : मानवत रोड-पाथरी रेल्वेमार्गाबाबत उदासिनता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मानवतरोड ते पाथरी हा रेल्वेमार्ग करण्याची मागणी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी अनेक दिवसांपासून लावून धरली असून या संदर्भात त्यांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी मोघम उत्तर दिल्याची बाब समोर आली आहे.
श्री साईबाबांचे जन्मस्थळ असलेले पाथरी देशाच्या रेल्वेच्या नकाशावर यावे, जेणेकरुन या भागाचा विकास व्हावा. तसेच श्री साईबाबांच्या देशभरातील भक्तांना पाथरीत येणे सुकर व्हावे, या व्यापक दृष्टीकोनातून आ.बाबाजानी दुर्राणी यांनी मानवत रोड ते पाथरी हा रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी ३ वर्षांपासून पाठपुरावा चालविला आहे. पाथरीपासून पुढे सोनपेठमार्गे परळी हा मार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे रेल्वेचे अंतर कमी होईल. ही देखील या मागची आ.दुर्राणी यांची भूमिका होती. या अनुषंगाने त्यांनी ७ आॅगस्ट २०१७ रोजी विधानपरिषदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यामध्ये मानवत रोड ते पाथरी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील १६ कि.मी. रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत परभणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी २०१६ मध्ये मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिले आहे का? असल्यास परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांनी ३ मार्च २०१७ रोजी वा त्या सुमारास रेल्वे मंत्रालयाकडे विनंती केली आहे का? असल्यास रेल्वे मंत्रालयाने केलेल्या कार्यवाहीची मागणी दिली आहे का? असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे का? त्या अनुषंगाने कोणती कारवाई करण्यात आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
या प्रश्नावर तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ८ मार्च २०१९ रोजी लेखी उत्तर दिले. हे उत्तर नागपूर येथे सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ.दुर्राणी यांना प्राप्त झाले. त्यामध्ये रावते यांनी या संदर्भातील निवेदन प्राप्त झाल्याचे सांगून गृह विभागाच्या विशेष कार्यकारी अभियंत्यांनी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी रेल्वे मंत्रालयास विनंती करणारे पत्र पाठविले आहे. राज्यातील विविध मार्गाचे तसेच रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी शासनस्तरावर बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात येतो, एवढीच मोघम व या रेल्वेमार्गाचा उल्लेख नसलेली माहिती लेखी स्वरुपात दिली आहे. यातूनच या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी राज्य शासनस्तरावर कशी चालढकल केली गेली आहे, हे स्पष्ट होते.
लोकप्रतिनिधींचीच पाठपुरावा करण्याची गरज
४मानवतरोड ते पाथरी हा रेल्वेमार्ग पहिल्या टप्प्यात होऊन त्यापुढे पाथरी- सोनपेठ ते परळी हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास विकासापासून कोसोदूर असलेले मानवत, पाथरी व सोनपेठ हे तालुके देश पातळीवरील रेल्वेच्या नकाशावर येतील.
४जेणेकरुन या भागाचा विकास होण्यास मदत होईल. तसेच श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळी दर्शनासाठी देशभरातून येणाºया भाविकांची सोय होणार आहे. असे असताना राज्य पातळीवर यासाठी उदासिनता दिसून येत असल्याने आता जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनाच यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे.
४याकरीता सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजुला सारुन मुंबई व दिल्लीत आपले राजकीय वजन खर्ची घालणे आवश्यक आहे.

Web Title: Parbhani: Depression on humanity road-stone railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.