परभणी : शासकीय समिती सदस्य निश्चित करा- नवाब मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:17 AM2020-01-26T00:17:24+5:302020-01-26T00:17:47+5:30

विविध शासकीय समित्यांच्या स्थापनेसंदर्भातील फॉर्म्युला ठरला असून, येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समिती सदस्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी येथे आयोजित मेळाव्यात बोलताना केले.

Parbhani: Determine the Governing Committee members - Nawab Malik | परभणी : शासकीय समिती सदस्य निश्चित करा- नवाब मलिक

परभणी : शासकीय समिती सदस्य निश्चित करा- नवाब मलिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विविध शासकीय समित्यांच्या स्थापनेसंदर्भातील फॉर्म्युला ठरला असून, येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समिती सदस्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी येथे आयोजित मेळाव्यात बोलताना केले.
शहरातील वसमत रोडवरील राष्टÑवादी भवनमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मलिक बोलत होते. यावेळी राकाँ जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खा.सुरेश जाधव, राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष भावनाताई नखाते, सोनाली देशमुख, संतोष बोबडे, संतोष देशमुख, रितेश काळे, राष्टÑवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, नंदाताई राठोड आदींची मंचावर उपस्थिती होती. मलिक म्हणाले, अ.भा. राकाँचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पर्यायी सरकार देण्याच्या उद्देशाने शिवसेना- काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात स्थापन केले. त्यामुळे राज्यातील जनतेची कामे करण्याची जबाबदारी आता आपली आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक, बेरोजार यांच्या हिताचे निर्णय सरकार घेतच आहे. मात्र हे निर्णय घेत असताना पक्ष संघटन मजबूत असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा मंत्रीमंडळ स्थापन होते. मात्र जिल्हा, तालुका स्तरावर समित्यांची स्थापना लवकर होत नाही. पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर असून, मित्र पक्षांशी चर्चा करुन जिल्ह्यातील समित्यांच्या सदस्यांची नावे येत्या पंधरा दिवसांत निश्चित करावीत. समित्यांच्या माध्यमातून राज्याचा आलेला निधी, विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. पक्षातील कार्यकर्त्यांना ताकद देण्याची जबाबदारी मी पार पाडेन. मात्र संघटना मजबूत करा. पक्ष वाढवा, अशा सूचना देत असतानाच इतर पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यापेक्षा नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याच्या सूचना मलिक यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बोलताना आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. येत्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील पक्ष संघटन आणखी मजूबत करण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक यांच्यासमवेत चर्चा करुन प्रयत्न केले जाणार आहेत. त्यादृष्टीने लवकरच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जातील, असे आ.दुर्राणी यांनी सांगितले. यावेळी भावनाताई नखाते, माजी खा.सुरेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा.किरण सोनटक्के यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमात नवनिर्वाचित जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी, जि.प. सभापती मीराताई टेंगसे, जि.प. समाजकल्याण रामराव उबाळे, पं.स. सभापती कल्पना थोरात, मीरा जाधव, अशोक बोखारे आदींचा पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यास जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पैसे भरणाºया शेतकºयांसाठीही योजना
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर नियमित कर्ज फेडणाºया शेतकºयांचे काय? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यावरही शासन विचार करीत असून, नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांसाठीही लवकरच योजना राबविली जाणार आहे. तसेच ३ लाखांपेक्षा अधिक पीक कर्ज असणाºया शेतकºयांसाठीही शासन योजना राबविणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
प्रत्येक महिन्यात परभणीला येणार
परभणी जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विकासाची कामे तर करणारच आहे. शिवाय जिल्ह्यात पक्षाचे संघटन आणखी वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार आहे. यापुढील दौºयात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत तीन ते चार तास बैठक घेणार आहे, असे सांगून मी केवळ ध्वजारोहणापुरता नाही तर प्रत्येक महिन्यात जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे पालकमंत्री मलिक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: Parbhani: Determine the Governing Committee members - Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.