परभणी : आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:28 AM2019-09-01T00:28:53+5:302019-09-01T00:29:35+5:30
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार येथून धनगर समाज बांधवांच्या या मोर्चाला प्रारंभ झाला. मोठा मारुती, जिल्हा स्टेडियममार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी पद्मश्री खा.विकास महात्मे, बबन मुळे, सुरेश भुमरे, अनंत बनसोडे यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. धनगर समाजाचा आरक्षण लढा एकजुटीने लढल्यानेच आतापर्यंत शासनाकडून विविध सवलती समाजाला मिळाल्या. १ हजार कोटी रुपयांच्या सवलती या आंदोलनाच्या दबावामुळेच समाजाला मिळू शकल्या, असे सांगून एस.टी.चे प्रमाणपत्र मिळेपर्यंत आरक्षणाचा लढा सुरुच ठेवणार असल्याचे खा. महात्मे यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात बबनअण्णा मुळे, सुरेश भुमरे, अनंत बनसोडे, मारोतराव पिसाळ, कठाळूमामा शेळके, सखाराम बोबडे, नारायण घनवटे, दीपक शेंद्रे, गंगाधर खेडूळकर, गंगाधर पितळे, अप्पा बनसोडे, नामदेव आव्हाड, अशोक मुळे, सुरेश चांदणे, पिराजी भुमरे, राम ढेंबरे, विष्णू बोरचाटे, संगीता जगाडे, गंगासागर वाळवंटे, विष्णू कोरडे, गणेश मुळे, सचिन गारुडी, लक्ष्मण बोबडे, गोविंद पारटकर, अनिल ताल्डे, बाळू बोबडे, वैजनाथ भंडारे, नामदेव निळे, गोपाळ मात्रे, सरपंच सीमा घनवटे, प्रभाकर जगाडे, राजेश बालटकर, नरसिंग ढेंबरे, लक्ष्मण वैद्य आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.