परभणी :आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:18 AM2018-08-28T00:18:01+5:302018-08-28T00:18:48+5:30

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Parbhani: 'Dhol Baazo' movement for reservation | परभणी :आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन

परभणी :आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजेपासून आंदोलनाला प्रारंभ झाला. तालुक्यातील ग्रामीण भागातील समाज बांधव परभणीत दाखल झाले होते. काठी, घोंगडी आणि डोक्यावर पिवळा पटका बांधून पारंपारिक वेषात काही समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सुरेश भूमरे, मारोतराव बनसोडे, टी.टी.सुभेदार, कठाळू शेळके आदींनी आपल्या भाषणांमधून समाजाला आरक्षणाची नितांत आवश्यकता असताना शासन वेळकाढू धोरण अवलंब असल्याचा आरोप करीत एस.टी. आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर सुरेश भूमरे, मारोतराव बनसोडे, गणेश मिरासे, विलास लुबाळे, प्रा.तुकाराम साठे, अनंतराव कोरडे, दीपक शेंद्रे, गजानन चोपडे, विष्णू बोरचाटे, गजानन जोरवर आदींची नावे आहेत.
ल्लगंगाखेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
गंगाखेड- येथील तहसील कार्यालयासमोर पारंपारिक वेषभूषेत आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भाऊसाहेब कुकडे, जयदेव मिसे, जितेश मोरे, हनुमान देवकते, कैलास रबदडे, शिवाजी बोबडे, सदाशीव कुंडगीर, माधव शेंडगे, सखाराम बोबडे, रुखमाजी लवटे, भगवान बंडगर, माऊली ठेंबरे, संदीप आळनुरे, गजानन देवकते आदींची नावे आहेत. दरम्यान, भाजपाचे रामप्रभू मुंडे, रासपचे डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
ल्लपाथरीत मोर्चा
पाथरी- धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाथरीत २७ आॅगस्ट रोजी पाथरी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. शहरातील अहिल्यानगर येथून सुरु झालेला मोर्चा राष्ट्रीय महामार्गाने कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू कॉर्नरमार्गे तहसीलवर पोहचला. या ठिकाणी अनेकांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दत्तात्रय मायंदळ, रमेशराव सोनटक्के, बळीराम नवघरे, डिगंबर ताल्डे, बाबासाहेब दुगाणे, राजेभाऊ हिंगे, नितीन दुगाणे, दिलीप धरपडे, दत्तराव नेमाणे, माऊली नेमाणे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालममध्ये आंदोलन
पालम- येथील तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ढोल जागर आंदोलन करण्यात आले. तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरापासून धनगर समाज बांधवांनी रॅली काढली. ही रॅली नवामोंढा, मुख्य चौक बसस्थानकमार्गे तहसील कार्यालयावर धडकली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तहसील समोर सरकारला इशारा देत ढोल वाजवून गजर करण्यात आला. यावेळी गणेश घोरपडे, भागवत बाजगीर, विजय घोरपडे, चंद्रकांत ताठे, नरहरी घोरपडे, माऊली घोरपडे, दत्ता घोरपडे, नारायण अडकिणे, शंकर वाघमारे, सर्जेराव धुळगुंडे, गोपाळ देवकते, रामचंद्र काळे, अशोक लवटे, साहेब सुरनर, आत्माराम सोडनर, मुंजाजी आव्हाड, बबन जेडगे, शेंगुळे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सोनपेठमध्ये ढोल जागर
सोनपेठ- येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी ढोल- जागर आंदोलन केले. नायब तहसीलदार डॉ.निकेतन काळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर दिनकर तिथे, प्रकाश देवकते, वैजनाथ डोणे, नितीन सावंत, पिंटू आळसे, अशोक मुळे, राजाभाऊ निळे, रामेश्वर आळसे, माणिक आळसे, बालाजी धोत्रे, अशोक पुंजारे, शुभम डोणे आदींची नावे आहेत.
जिंतूर शहरात धनगर समाजाचे आंदोलन
जिंतूर- जिंतूर येथेही शासकीय विश्रामगृहावर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या आंदोलनात प्रा.डॉ.प्रभाकर वजीर, अनंतराव कोरडे, दीपक शेंद्रे, कुबेर हुलगुंडे, प्रकाश शेवाळे, अर्जून वजीर, मनोज शिंपले, भारत शेवाळे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नायब तहसीलदार जी.आर.गावंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा.डॉ.प्रभाकर वजीर यांनी मार्गदर्शन करीत ३१ आॅगस्ट रोजी औरंगाबाद येथे होणाºया मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. ज्ञानेश्वर आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ धनवटे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अमोल आव्हाड, दीपक खताळ, संजय शिंपले, नारायण जगाडे, उत्तम शिंपले, सतीश ताल्डे, डिगंबर जावळे, रुस्तुम गडदे, अंबादास धनवटे, गजानन पावडे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Parbhani: 'Dhol Baazo' movement for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.