परभणी : रस्ता खोदून काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:40 AM2019-09-21T00:40:14+5:302019-09-21T00:40:53+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या इसाद रस्त्यावरील आनंदवाडी ते टोकवाडी हा अडीच कि.मी. रस्ता खोदून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे टोकवाडी ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या इसाद रस्त्यावरील आनंदवाडी ते टोकवाडी हा अडीच कि.मी. रस्ता खोदून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे टोकवाडी ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्र व राज्य शासन पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण रस्ते आदी योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे; परंतु, या योजनांंची अंमलबजावणी करताना मात्र संंबंधित अधिकारी, कर्मचारी उदासिन धोरण स्विकारत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना दर्जेदार रस्ते वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी ते टोकवाडी गावाकडे जाणाऱ्या अडीच कि.मी.च्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी तालुका, जिल्हा व लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला. संबंधित कंत्राटदाराने तीन महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर हा रस्ता दोन्ही बाजूने खोदण्यात आला आहे.
विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजुचीच माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यानंतर तीन महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे थोडासा पाऊस झाला तर दुचाकी व चारचाकी वाहने या रस्त्यावरून घसरत आहेत. त्यामुळे टोकवाडी येथील ग्रामस्थांचे व पेडजाई मंदिराकडे जाणाºया ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी टोकवाडी ग्रामस्थांमधून होत आहे.
ग्रामस्थांची तहसीलदारांकडे धाव
४गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी ते टोकवाडी या रस्त्याची पाहणी करून बंद पडलेल्या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी टोकवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.
४निवेदनावर नामदेव तांदळे, ज्ञानोबा फड, माणिक मुंडे, शिवा तांदळे, महेश तांदळे, बळीराम जाधव, बळीराम नागरगोजे, राहुल फड, बालाजी जाधव, व्यंकटी नागरगोजे, बाळासाहेब मुंडे, प्रकाश नागरगोजे, ज्ञानोबा जाधव, संजय वडजकर, भानुदास जाधव, दीपक मगर, निवृत्ती जाधव, विठ्ठल तांदळे, आश्रोबा मुंडे, ज्ञानोबा चाटे, पिंटू जोगदंड आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.