परभणी : वादानंतर अधिकारी-पदाधिकाऱ्यांत दिलजमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:32 AM2019-09-01T00:32:19+5:302019-09-01T00:32:59+5:30

पाझर तलावाच्या रखडलेल्या कामावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद अखेर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मिटला. त्यानंतर सर्वासधारण सभेसमोर ठेवलेल्या विषयांवर चर्चा होऊन सभेची सांगता झाली.

Parbhani: Diljai joins the office-bearers after the debate | परभणी : वादानंतर अधिकारी-पदाधिकाऱ्यांत दिलजमाई

परभणी : वादानंतर अधिकारी-पदाधिकाऱ्यांत दिलजमाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: पाझर तलावाच्या रखडलेल्या कामावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद अखेर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मिटला. त्यानंतर सर्वासधारण सभेसमोर ठेवलेल्या विषयांवर चर्चा होऊन सभेची सांगता झाली.
जिल्हा परिषद अध्यक्षांचा अवमान केल्याच्या कारणावरुन २९ आॅगस्ट रोजी सत्ताधारी जि.प. सदस्यांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर ३१ आॅगस्ट रोजी जि.प. सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथील रखडलेल्या पाझर तलावाच्या कामावरुन हा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी १२ वाजेच्या सुमारास सभेला सुरुवात झाली. काही विषयांवर चर्चा झाल्यानंतर राकाँचे गटनेते अजय चौधरी यांनी अंबरवाडी येथील पाझर तलावाचे काम का रखडले, याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्याकडे मागितली. मात्र ही माहिती सभागृहात देणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने सदस्य संतप्त झाले. गोंधळ वाढत असल्याने सीईओ पृथ्वीराज यांनी या सभागृहात माझा अपमान होत असेल तर मी थांबणार नाही, अध्यक्षांनी मला जाण्याची परवानगी द्यावी, असे म्हणून ते सभागृहाबाहेर पडले. दुपारी अडीच वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत सभेचे कामकाज चालले असले तरी त्यात ठोस निर्णय झाले नाहीत. साधारणत: ४ वाजेच्या सुमारास सदस्य सभागृहाबाहेर पडले. या सर्व प्रकारानंतर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रताप सवडे यांनी अधिकारी आणि पदाधिकाºयांमध्ये मध्यस्थी केली. त्यानंतर साधारणत: ५.३० वाजेच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज सभागृहात दाखल झाले. शासन आणि प्रशासन दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोघांनी मिळून चांगले काम करु. प्रशासनाकडून काही अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे पृथ्वीराज यांनी सभागृहासमोर सांगितले. त्यानंतर पदाधिकाºयांच्या वतीने जि.प.च्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनीही सदस्य प्रशासनाला सहकार्य करतील. जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी सदस्यांची नेहमी सकारात्मक भूमिका राहील, असे सांगितले. त्यानंतर सभेचे कामकाज सुरळीत पार पडले.
विविध विषयांना मंजुरी
४सायंकाळी सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली. त्यात ग्रामीण भागाच्या विकासाच्या अनुषंगाने असलेल्या विषयांना मंजुरीही देण्यात आली. आगामी काळात विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सभेचे कामकाज पूर्ण झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
अंबरवाडीच्या कामावरून होता वाद
अंबरवाडी येथील पाझर तलावाचे काम दोन वर्षांपासून सुरू होत नसल्याने सत्ताधारी सदस्यांमध्ये नाराजी होती. या संदर्भात २९ आॅगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभेच्या दिवशी सदस्य आणि सीईओंमध्ये वाद झाल्याने सभा तहकूब झाली होती. दरम्यान, शनिवारी सायंकाळी प्रकल्प अधिकारी प्रताप सवडे यांनी मध्यस्थी केल्याने या वादावर पडला पडला आहे.

Web Title: Parbhani: Diljai joins the office-bearers after the debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.