परभणी : सुविधांअभावी भाजीपाला विक्रेत्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:01 AM2019-08-01T00:01:43+5:302019-08-01T00:01:57+5:30
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात खरेदी- विक्रीसाठी ३० ते ४० गावातील ग्रामस्थ येतात; परंतु, या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने बुधवारी चक्क चिखलात बसूनच भाजीपाला विक्री करावा लागल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात खरेदी- विक्रीसाठी ३० ते ४० गावातील ग्रामस्थ येतात; परंतु, या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने बुधवारी चक्क चिखलात बसूनच भाजीपाला विक्री करावा लागल्याचे दिसून आले.
जिंतूर बाजार समितीची उपबाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया येलदरी या गावाला परिसरातील ३० ते ४० गावे जोडली गेली आहेत. या गावातील ग्रामस्थ खरेदी- विक्रीसाठी येलदरी येथे येतात. या ठिकाणी दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारात २०० ते अडीचशे भाजीपाला विक्रेते, व्यापारी येतात. तर खरेदीसाठी १० ते १५ हजार ग्रामस्थांची वर्दळ असते.
मागील आठ दिवसांपासून येलदरी व परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे बुधवारी नियमितपणे आठवडी बाजार भरला; परंतु, या बाजाराच्या मैदानात भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याने चक्क चिखलात बसूनच भाजीपाला विक्री करावा लागला. परिणामी चिखलाने, घाणीने माखलेल्या भाज्यांची ग्रामस्थांना खरेदी करावी लागली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बाजार समितीने या ठिकाणी सर्व सुुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी व्यापारी, भाजी विक्रेते व ग्राहकांमधून होत आहे.
बाजार ओटे उभारण्याची मागणी
४जिंतूर तालुक्यातील येलदरी हे गाव मोठे बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. या गावाशी परिसरातील २० ते २५ गावांचा संपर्क दररोज येतो.
४दर बुधवारी या ठिकाणी आठवडी बाजार असतो. या बाजारात जवळपासच्या खेड्यातील ग्रामस्था मोठ्या संख्येने बाजारहटासाठी येतात. बाजारात व्यापारासाठी येणाºया व्यापाऱ्यांसाठी बाजार ओटे उभारावेत, अशी मागणी होत आहे.