परभणी : निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:36 PM2019-02-25T23:36:05+5:302019-02-25T23:36:42+5:30
गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पुढील आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सर्वत्र या निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार अधिकाºयांच्या बदल्यानांही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाने १६ जानेवारी २०१९ रोजी अधिकाºयांच्या बदल्याच्या अनुषंगाने एक आदेश काढला आहे. त्या आदेशामुळे काही अधिकारी संभ्रमात सापडले आहेत. या आदेशात देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, ज्या अधिकाºयावर गुन्हे दाखल झाले आहेत व त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्या अधिकाºयांना निवडणुकीशी संबंधित कामे देण्यात येऊ नयेत. त्यामुळे अशा अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही अधिकाºयांनी, निवडणुकीशी संबंधित गुन्हे दाखल असतील तर कामे देऊ नयेत, असाही या आदेशाचा अर्थ काढला आहे. त्यामुळे अधिकाºयांमध्येच याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे काही अधिकाºयांवर गुन्हे दाखल असताना त्यांची निवडणुकीच्या कामाच्या मुख्य प्रवाहात बदली करण्यात आली आहे. तर काही अधिकाºयांना त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे कारण पुढे करुन निवडणुकीशी संबंधित त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे अधिकारीही संभ्रमात सापडले आहेत.
या प्रकरणी आता निवडणूक आयोगाच्याच वरिष्ठ अधिकाºयांनी आदेशाबाबत स्पष्टता आणावी, अशीही अपेक्षा या अधिकाºयांमधून व्यक्त होत आहे.
२४ मार्च रोजी ग्रा.पं.च्या पोट निवडणुका
४एप्रिल २०१९ ते जून २०१९ मध्ये मुदत संपणाºया आणि नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व थेट निवडणुकीद्वारे भरावयाच्या सरपंचपदाच्या पोट निवडणुकीसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. तसेच दोन गावांमधील सरपंचाच्या रिक्त पदासाठी थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार आहे. या संदर्भातील आदेश राज्य निवडणूक आयोगाने २० फेब्रुवारी रोजी काढले आहेत. त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली. ५ मार्चपासून अर्ज दाखल करता येणार आहेत.