परभणी : जायकवाडीच्या पाण्याचा चार वितरिकांमधून विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:24 PM2019-08-23T23:24:19+5:302019-08-23T23:25:01+5:30
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पाथरी तालुक्यात दाखल झाल्यानंतर चार वितरिकांमधून ते सोडण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ३ हजार ५०० हेक्टर शेत जमिनीला सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पाथरी तालुक्यात दाखल झाल्यानंतर चार वितरिकांमधून ते सोडण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ३ हजार ५०० हेक्टर शेत जमिनीला सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे.
जायकवाडी धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नदीपात्रातील पाणी काही दिवसांपूर्वी पाथरी तालुक्यात दाखल झाले. त्यानंतर पाथरी तालुक्यातील जायकवाडीचा डावा कालवा आणि गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव व मुद्गल येथील बंधाऱ्यात पाणी आल्याने दोन्ही बंधाºयात राखीव पाण्याचा साठा ठेवून हे पाणी खाली सोडण्यात येत आहे. शुक्रवारी ढालेगाव बंधाºयात ३.४६ तर मुद्गल बंधाºयात २ दलघमी पाणीसाठा होता. जायकवाडी धरणातून १६०० क्युसेसने सोडलेल्या पाण्यातील ११८० क्युसेस पाणी जायकवाडीचा मुख्य कालवा १२२ वर विसर्ग होत आहे. ढालेगाव बंधाºयासाठी डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आलेले आहे.
आता जायकवाडीच्या शाखा कालवा देवनांद्रा येथील बी-५९ वरुन २५० क्युसेस पाण्याचा विसर्ग सध्या सिंचनासाठी वाघाळा, गुंज, लोणी, बाबुलतार, टाकळगव्हाण, सारोळा, तुरा या भागात करण्यात येत आहे. वितरिका क्रमांक ५९ अ मधून पोहेटाकळी, रेणापूर भागात ४० क्युसेसने तर वितरिका क्रमांक ४७ वरुन कासापुरी, पाथरगव्हाण बु., बाणेगाव, जवळा झुटा भागात ८० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. तसेच वितरिका क्रमांक ४९ वर हदगाव, वरखेड या भागात ५० क्युसेस आणि वितरिका क्रमांक ६१ वर केकरजवळा, इटाळी, पिंपळगाव, सारोळा बु. या भागात ६० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. चार वितरिकांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जवळपास ३ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे, अशी माहिती उपअभियंता डी.बी.खारकर यांनी दिली.
पाथरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
४पाथरी शहराला ढालेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. बंधाºयात सध्या ३.४६ दलघमी पाणीसाठा आहे. पाथरी नगरपालिकेने येथे ३.४६ दलघमी पाणी आरक्षित केले आहे.
४त्यामुळे एवढे पाणी शिल्लक ठेवून इतर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी बंधाºयात मूबलक पाणी उपलब्ध असल्याने पाथरी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.