परभणीत२० लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:37 AM2017-12-06T00:37:53+5:302017-12-06T00:38:07+5:30

महावितरणच्या अंमलबजावणी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये अमरावती, अकोला, बुलडाणा व परभणी या चार पथकांनी जिल्ह्यात तीन दिवस वाणिज्य वीज ग्राहकांची तपासणी केली. यामध्ये ५१ वीज ग्राहक तपासण्यात आले. त्यापैकी ३४ वीज ग्राहकांच्या मीटरमध्ये अनियमितता आढळलीे. त्यातील २७ वीज चोरी करणाºया ग्राहकांची जवळपास २० लाख रुपयांची वीज चोरी या पथकाने उघडकीस आणली आहे.

Parbhani disclosed power stolen 20 lakh rupees | परभणीत२० लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस

परभणीत२० लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महावितरणच्या अंमलबजावणी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये अमरावती, अकोला, बुलडाणा व परभणी या चार पथकांनी जिल्ह्यात तीन दिवस वाणिज्य वीज ग्राहकांची तपासणी केली. यामध्ये ५१ वीज ग्राहक तपासण्यात आले. त्यापैकी ३४ वीज ग्राहकांच्या मीटरमध्ये अनियमितता आढळलीे. त्यातील २७ वीज चोरी करणाºया ग्राहकांची जवळपास २० लाख रुपयांची वीज चोरी या पथकाने उघडकीस आणली आहे.
विद्युत वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यात २ लाख ८२ हजार ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठा करण्यासाठी १० उपविभाग स्थापन केले आहेत. यामध्ये परभणी शहर, पाथरी, पूर्णा, परभणी ग्रामीण, गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, सेलू, सोनपेठ या उपविभागांतर्गत वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. तसेच ग्राहकांना विजेच्या संबंधी येणाºया अडचणी या विभागामार्फत सोडविल्या जातात.
वीज वितरण कंपनीच्या वीज पुरवठा केलेल्या ग्राहकांना महिन्याकाठी बिल दिल्या जाते. परंतु, चार ते पाच महिन्यांपासून महावितरणच्या काही वीज ग्राहकांनी त्यांना आलेल्या बिलांचा भरणा केलेला नाही.
त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढत गेला आहे. यामध्ये १ लाख ७० हजार ९०० घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १५६ कोटींची थकबाकी आहे. १२ हजार ४०५ वाणिज्य ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ९ कोटी ५९ लाख, ३ हजार ४८७ औद्योगिक ग्राहकांकडे साडे पाच कोटी तर ९२ हजार कृषी पंपधारकांकडे ७५० कोटी, ७५२ नळ योजना पाणीपुरवठ्याकडे २० कोटी, १ हजार ५८३ पथदिव्यांकडे ७५ कोटी थकबाकी आहे. अशी एकूण महावितरणची जिल्ह्यामध्ये जवळपास १ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये वीज ग्राहकांकडे थकबाकीचा मोठा डोंगर आहे. त्यातच वीज चोरीचे प्रमाणही वाढले आहे. या चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने मराठवाड्यात पथके नेमण्यात आली आहेत.
या पथकांकडून जिल्ह्यातील वाणिज्य वीज ग्राहकांची तपासणी करुन वीज चोरीचे प्रकार उघडकीस आणले जात आहेत. जिल्ह्यामध्ये अमरावती, अकोला, बुलडाणा, परभणी या चार जिल्ह्यातील पथकाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, वाईन शॉप, ढाबा अशा ५१ वाणिज्य ग्राहकांची तपासणी केली. त्यामध्ये या पथकाला ३४ ग्राहकांकडे अनियमितता आढळून आली. त्यातील २७ ग्राहकांकडून वीज चोरी होत असल्याचे उघडकीस आले. या ग्राहकांकडून महावितरणची जवळपास २० लाख रुपयांची वीज चोरी तपासणीच्या वेळी उघडकीस आली.

Web Title: Parbhani disclosed power stolen 20 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.