परभणी : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर मुंबईत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:40 AM2019-02-03T00:40:12+5:302019-02-03T00:40:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : अनुदानापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी आ़ बच्चू कडू यांनी सहकार व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अनुदानापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी आ़ बच्चू कडू यांनी सहकार व पणन खात्याचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील यांची भेट घेऊन अनुदान देण्याची मागणी केली़
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने २०० रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे़ मात्र यासाठी हा कांदा बाजार समितीने खरेदी करणे बंधनकारक केले आहे़ परभणी जिल्ह्यात बाजार समितीमार्फत कांद्याची खरेदी होत नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक अनुदानापासून वंचित आहेत़ या प्रश्नी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी अनेक वेळा आंदोलन केले़ मात्र न्याय मिळत नसल्याने अखेर आ़ बच्चू कडू यांनी सहकार व पणन खात्याचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील यांची भेट घेऊन परभणीतील प्रश्न मांडला़ यावेळी शिवलिंग बोधने, रोहिदास बोबडे, भगवान काळे आदी उपस्थित होते़