परभणी : मतदान यंत्राविषयीच्या शंकांचे प्रशासन करणार निरसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:10 AM2018-12-11T01:10:44+5:302018-12-11T01:11:56+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, मतदान यंत्र आणि प्रथमच निवडणुकांत वापरल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅटविषयी मतदारांच्या काही शंका असतील तर त्याचे निरसन केले जाणार आहे. यासाठी रुट प्लॅन आखला असून, जिल्ह्यात दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, मतदान यंत्र आणि प्रथमच निवडणुकांत वापरल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅटविषयी मतदारांच्या काही शंका असतील तर त्याचे निरसन केले जाणार आहे. यासाठी रुट प्लॅन आखला असून, जिल्ह्यात दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पी. शिवशंकर म्हणाले, आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली असून, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण, प्रसार, प्रचार केला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे याबाबत मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी प्रभावी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.
ही जनजागृती मोहीम राबविण्यासाठी रुटप्लॅन तयार करण्यात आला आहे. तसेच प्रशिक्षण आणि प्रसारासाठी १० पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
पाथरी विधानसभा मतदार संघात ४, गंगाखेड ३, जिंतूर २ आणि परभणी मतदार संघात एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहरी भागात शक्यतो मतदान केंद्रनिहाय प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनवर पिवळ्या रंगाचे स्टीकर लावून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक पथकामध्ये पाच कर्मचाºयांचा समावेश असून, पथकासोबत पोलीस बंदोबस्तही दिला जाणार आहे. नागरिकांना आवाहन करण्यासाठी एक कर्मचारी, नोंदवहीत स्वाक्षरी घेण्यासाठी एक, प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी एक आणि मतदान झालेल्या चिठ्ठ्यांची प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी एका कर्मचारी नियुक्ती केली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकत्रित घेण्याचा निर्णय झाला तरीही जिल्हा निवडणूक विभाग सज्ज असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. निवडणूक विभागाच्या सूचनेनंतरच प्रत्यक्ष जनजागृतीला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची उपस्थिती होती.