परभणी : जिल्हाधिकाऱ्यांची वाळूघाटावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:58 PM2018-11-12T23:58:54+5:302018-11-12T23:59:27+5:30
गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर चक्क रुग्णवाहिकेतून नदीच्या घाटावर पोहोचल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांनी धूम ठोकली. एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाने ट्रॉली जागेवरच सोडून पळ काढला. ही ट्रॉली प्रशासनाने जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर चक्क रुग्णवाहिकेतून नदीच्या घाटावर पोहोचल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांनी धूम ठोकली. एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाने ट्रॉली जागेवरच सोडून पळ काढला. ही ट्रॉली प्रशासनाने जप्त केली आहे.
गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. तालुक्यातील वाळू धक्यांचा लिलाव झालेला नसताना गंगाखेड शहर परिसरासह महातपुरी, गौंडगाव, मैराळ सावंगी आदी ठिकाणाहून सर्रास वाळूचा उपसा होत आहे. विनापरवाना आणि अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारी थेट जिल्हाधिकाºयांकडेच करण्यात आल्या.
या तक्रारींची दखल घेऊन १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे रुग्णवाहिकेतून थेट महातपुरी येथील गोदावरी घाटावर पोहोचले. जिल्हाधिकारी वाळू घाटावर आल्याचे पाहून या ठिकाणी अवैधरीत्या वाळुचा उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांची धावपळ उडाली. चालकांनी ट्रॅक्टर घेऊन धूम ठोकली. पळून जात असतानाच एका ट्रॅक्टरची ट्रॉली कलंडली. त्यामुळे चालकाने ट्रॉली जागेवरच सोडून ट्रॅक्टरचे हेड घेऊन पळ काढला. उलटलेली ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.
तहसीलचे कर्मचारी धावपळ करीत पोहोचले
४जिल्हाधिकारी पी. शिवशंंकर रुग्णवाहिकेतून महातपुरी येथील वाळू घाटावर पोहोचले असून वाळू उपसा करणाºयांविरुद्ध कारवाई केली असल्याची माहिती समजल्यानंतर तहसीलच्या पथकाची धावपळ उडाली. काही वेळाने हे पथक वाळू घाटावर पोहोचले. तहसीलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, चंद्रकांत साळवे आणि इतर कर्मचाºयांनी गोदावरी घाटाकडे धाव घेऊन ट्रॅक्टरची उलटलेली ट्रॉली ताब्यात घेऊन कार्यवाही पूर्ण केली.
४जिल्हाधिकाºयांंनी सोमवारी केलेल्या या कारवाईमध्ये अवैध वाळू उपसा करणारी वाहने हाती लागली नसले तरी या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तहसील प्रशासनाने कारवाईचे सातत्य ठेवले तर उपशाला लगाम लागू शकतो.
अवैध वाळू उपशाकडे तहसीलचे दुर्लक्ष
४गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असताना तहसील कार्यालयातून मात्र कारवाई होत नाही. तहसीलचे अधिकारी, कर्मचारी वाळू उपशाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच या भागातील नागरिकांनी थेट जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी केल्या. जिल्हाधिकारी गंगाखेड येथे येऊन वाळू उत्खननाविरुद्ध कारवाई करीत असताना स्थानिक तहसील प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी काय करतात, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
४तालुक्यामध्ये गोदावरी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसल्याने नदीपात्रातील वाळुची चोरी थांबविण्याची जबाबदारी स्थानिक महसूल प्रशासनाची आहे. परंतु, वाळूचा सर्रास अवैध उपसा केला जात असल्याने प्रशासनाचीच जरब निर्माण होत नसल्याचे दिसून येत आहे.