परभणी जिल्ह्यात युवा मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:48 PM2019-10-13T23:48:22+5:302019-10-13T23:48:43+5:30

जिल्ह्याच्या मतदार यादीत युवा मतदारांची संख्या ४८ टक्के असल्याने या मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे़ त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना युवा मतदार केंद्रस्थानी ठेवून प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे़

Parbhani district decides to be young voters | परभणी जिल्ह्यात युवा मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

परभणी जिल्ह्यात युवा मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याच्या मतदार यादीत युवा मतदारांची संख्या ४८ टक्के असल्याने या मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे़ त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना युवा मतदार केंद्रस्थानी ठेवून प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे़
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारांनी जिल्ह्यात प्रचार फेऱ्यांना सुरुवात केली आहे़ राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत़ दुसरीकडे जिल्ह्यातील मतदार यादीचे अवलोकन केले असता, युवा मतदारांची संख्या निम्म्यापर्यंत पोहचल्याचे दिसते़
जिल्ह्यामध्ये एकूण १३ लाख ९८ हजार २७७ मतदार असून, त्यापैकी ६ लाख ७९ हजार ३८२ मतदार हे १८ ते ३९ वर्ष वयोगटातील आहेत़ त्यामुळे या मतदारांचे विचार, जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात त्यांचे प्रश्न, शिक्षणाबरोबरच रोजगार, औद्योगिक विकास या प्रश्नांवर उमेदवारांकडून ठोस आश्वासनांची अपेक्षा या मतदारांना आहे़ जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत १८ ते १९ या वयोगटात ३३ हजार १०६, २१ ते २९ वर्ष वयोगटातील ३ लाख ३४ हजार ९६९ आणि ३० ते ३९ वर्ष वयोगटात ३ लाख १२ हजार ३०७ मतदार आहेत़
३९ वर्षे वयापर्यंतच्या मतदारांची एकूण संख्या ६ लाखांच्या घरात आहे़ त्या तुलनेत ३९ वर्षांच्या पुढे मतदारांची संख्या कमी आहे़ या युवा मतदारांमध्ये १८ ते १९ वयोगटात २१ हजार १६८ पुरुष आणि ११ हजार ९३६ महिला मतदारांचा समावेश आहे़ २० ते २९ या वयोगटातही १ लाख ८६ हजार ४६९ पुरुष आणि १ लाख ४८ हजार ४९३ महिला मतदार आहेत़ तर ३० ते ३९ या वयोगटामध्ये १ लाख ६६ हजार ७५६ पुरुष आणि १ लाख ४५ हजार ५५० महिला मतदारांचा समावेश आहे़
या वयोगटातील मतदारांशी संपर्क साधणे, त्यांचे प्रश्न सोडविणे यावर उमेदवारांना भर द्यावा लागणार आहे़ युवा वयोगटामध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो़ त्यामुळे अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार सुरू केला आहे़ जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार प्रयत्न प्रयत्न करीत आहेत. एकंदर या निवडणुकीत युवकांचा कौल महत्त्वाचा असल्याने युवकांचे मतदान निर्णायक ठरेल, असे दिसते़
ज्येष्ठ नागरिकांत महिला मतदार अधिक
४जिल्ह्याच्या मतदार यादीत ५० वर्षे वयापर्यंत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी आहे़ मात्र ५० वर्षांच्या पुढील वयोगटात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे़
४त्यामध्ये ५० ते ५९ या वयोगटात ९८ हजार ३५४ पुरुष आणि १ लाख २ हजार ७२१ महिला मतदार आहेत़ ७० ते ७९ वयोगटात ३५ हजार ६६७ पुरुष आणि ४० हजार ८५८ महिला मतदार आहेत़ ८० ते ८९ या वयोगटात १५ हजार ९६६ पुरुष तर २३ हजार ३५१ महिला मतदार आहेत़
४९० ते ९९ या वयोगटात ३ हजार ६०७ पुरुष तर ५ हजार ७९२ महिला मतदार आहेत़ ९९ वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेल्या गटातही पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे़
४जिल्ह्यात ५७१ पुरुष मतदार ९९ पेक्षा अधिक वयाचे आहेत़ तर ९७१ महिला मतदार ९९ वर्षापेक्षा अधिक वयाच्या असल्याचे स्पष्ट होते़
२० ते २९ वयोगटात सर्वाधिक मतदार
४जिल्ह्याच्या मतदार यादीचे वयोगटनिहाय वर्गीकरण केले असता, या मतदार यादीत २० ते २९ या वयोगटात सर्वाधिक ३ लाख ३४ हजार ९६९ मतदार आहेत़ ३० ते ३९ वयोगटात ३ लाख १२ हजार ३०७, ४० ते ४९ या वयोगटात २ लाख ५५ हजार ६०१, ५० ते ५९ या वयोगटात २ लाख १ हजार ७५ मतदार असून, ६० ते ६९ वयोगटात १ लाख ३४ हजार ४३६ आणि ७० ते ७९ वयोगटात ७६ हजार ५२५ मतदार आहेत़ ८० ते ८९ या वयोगटात ३९ हजार ३१७ तर ९० ते ९९ या वयोगटामध्ये ९ हजर ३७९ मतदार आहेत़
दीड हजार मतदार ९९ पेक्षा अधिक वयाचे
४जिल्ह्याच्या मतदार यादीत १ हजार ५४२ मतदारांचे वय ९९ वर्षापेक्षा अधिक वयाचे आहे़ त्यात जिंतूर मतदार संघामध्ये १५१ पुरुष, २५३ महिला मतदार ९९ वर्षापेक्षा अधिक वयाच्या आहेत़
परभणी मतदार संघात ७४ पुरुष आणि १३३ महिला, गंगाखेड मतदार संघात १९३ पुरुष आणि ३३६ महिला तर पाथरी विधानसभा मतदारसंघात १५३ पुरुष आणि २४९ महिला मतदार ९९ वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेल्या आहेत़

Web Title: Parbhani district decides to be young voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.