परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:43 AM2019-07-30T00:43:54+5:302019-07-30T00:44:37+5:30

राज्यात इतर ठिकाणी धो धो पाऊस पडत असताना पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे पूर्णा नदीवरील खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर हे तिन्ही धरणे आजमितीस ज्योत्याखाली आहेत़ त्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे़

Parbhani district feared to be drought-prone | परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती

परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): राज्यात इतर ठिकाणी धो धो पाऊस पडत असताना पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे पूर्णा नदीवरील खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर हे तिन्ही धरणे आजमितीस ज्योत्याखाली आहेत़ त्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे़
पावसाळा सुरू होवून दोन महिने लोटले तरी देखील अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापपर्यंत ज्योत्याखालीच आहे़ धरणाखालील पूर्णा नदी देखील भर पावसाळ्यात कोरडीठाक आहे़ त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ मृग नक्षत्र ८ जूनपासून सुरू झाले़ मात्र हे नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले़ त्यानंतर मृगनक्षत्रातही शेतकऱ्यांच्या पेरण्याच झाल्या नाहीत़ त्यामुळे २२ जून रोजी लागलेल्या आर्द्रा नक्षत्राकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते़ मात्र या नक्षत्रात देखील दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण असलेले येलदरी धरण देखील यावर्षी मृत साठ्याच्यावर आले नाही़ त्यामुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ धरणाखालील पूर्णा नदीचे पात्र भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे़ त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस झाला नाही तर परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे़ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ हीच परिस्थिती पावसाळाभर राहिली तर जिल्ह्याचा दुष्काळवाडा झाल्याशिवाय राहणार नाही़ त्यामुळे प्रशासनानेही ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़
गतवर्षीच्या तुलनेत निम्माच पाऊस
४गतवर्षीच्या तुलनेत निम्मा म्हणजेच १४० मिमी पाऊस या भागात कमी झाला आहे़ धरणातील पाणीसाठाही गतवर्षी मृतसाठ्यात होता़ याही वर्षी तर २३ दलघमी मृतसाठ्यापेक्षाही कमी आहे़ यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे़ हीच परिस्थिती येलदरीच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धेश्वर धरणाची आहे़
४हे धरण देखील ज्योत्याखालीच आहे़ या धरणातील मृत पाणीसाठ्यात सुद्धा ५९ दलघमी पाणीसाठा कमी आहे़ त्यामुळे या धरणात सध्या केवळ १११ दलघमी मृत पाणीसाठा शिल्लक आहे़ खडकपूर्णा धरणात देखील मृतसाठ्यात पाणीसाठा शिल्लक आहे़ त्यामुळे स्थिती गंभीर होणार आहे़

Web Title: Parbhani district feared to be drought-prone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.