परभणी जिल्ह्याला निम्न दूधनातून मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:01 PM2019-05-04T23:01:54+5:302019-05-04T23:02:19+5:30

जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर निम्न दूधना प्रकल्पातून १५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली असून, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना या संदर्भातील आदेश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहेत़ त्यामुळे जिल्हावासियांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला आहे़

Parbhani district gets water from low milk | परभणी जिल्ह्याला निम्न दूधनातून मिळणार पाणी

परभणी जिल्ह्याला निम्न दूधनातून मिळणार पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर निम्न दूधना प्रकल्पातून १५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली असून, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना या संदर्भातील आदेश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहेत़ त्यामुळे जिल्हावासियांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला आहे़
परभणी जिल्ह्यात दुष्काळामुळेपाणी टंचाई गंभीर झाली आहे़ आ.डॉ.राहुल पाटील यांनी ही बाब परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निदर्शनास आणून दिली़ शेतकऱ्यांनीही रावते यांच्याशी संपर्क साधून निम्न दूधनातून पाणी सोडण्याची मागणी केली होती़ त्यानुसार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातील टंचाईचा आढावा त्यांच्यासमोर मांडला़ त्यानंतर विशेष बैठक घेण्यात आली़ निम्न दूधना प्रकल्पातून पाणी सोडणे आवश्यक असल्याचे रावते यांनी निदर्शनास आणून दिले़ त्यावरून मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना आदेश दिले़ त्यानुसार एक बैठक घेऊन निम्न दूधना प्रकल्पातून १५ दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय झाला़ तसे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना देण्यात आले़ येत्या १५ मेपर्यंत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होईल, अशी माहिती मिळाली आहे़ दरम्यान, रावते यांच्या प्रयत्नामुळे दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे़
आ़पाटील यांनी केली होती मागणी
निम्न दूधना प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी करीत आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला होता़ तसेच परिवहन दिवाकर रावते यांच्याकडेही पाठपुरावा केला होता़ निम्न दूधना प्रकल्पात ३६ दलघमी पाणी असून, १५ दलघमी पाणी सोडणे शक्य आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते़ पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Parbhani district gets water from low milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.